नाशिक – ‘इंडिया दर्पण’ हे अत्यंत प्रभावशाली माध्यम आहे. अतिशय वेगवान बातम्या देण्याची हातोटी आणि वैविध्यपूर्ण मजकूर यामुळे अतिश कमी वेळेत तो लोकप्रिय झाले आहे. अवघ्या १५९ दिवसात ११ लाखांपर्यंत पोहचलेले इंडिया दर्पण लवकरच कोट्यवधी लोकापर्यंत पोहचो आणि त्याची आनंद वार्ता मला मिळो, असे कौतुकोद्गार राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी काढले.
इंडिया दर्पण लाईव्ह या वेबसाईटने ११ लाख दर्शकांचा टप्पा पार केल्याने आणि इंडिया दर्पण या साप्ताहिकाच्या २१व्या विशेषांकाचे प्रकाशन भुजबळ यांच्या हस्ते भुजबळ फार्म येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते.
बघा, भुजबळ या कार्यक्रमात काय म्हणाले (व्हिडिओ)