मुंबई/नाशिक – अल्पावधीतच इंडिया दर्पण लाईव्ह या वेब न्यूज पोर्टलने ८ लाख दर्शकांचा (व्ह्यूज) टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच ५ लाख दर्शकांची नोंद झाली होती. त्यामुळे अवघ्या काही दिवसातच त्यात ३ लाख दर्शकांची भर पडली आहे. कोणताही गाजावाजा व जाहिरात न करता सुरु झालेल्या या पोर्टलला शहराबरोबरच ग्रामीण भागातही उदंड पसंती मिळाली आहे. विशेष म्हणजे हे पोर्टल व्यावसायिक पातळीवरही यशस्वी ठरले आहे. जगभरातील विविध ब्रँण्डेड कंपनीच्या जाहिराती गुगलच्या माध्यमातून या पोर्टलवर दीड महिन्यातच सुरु झाल्या. तर स्थानिक जाहिरातदारांनी सुद्धा तितकाच प्रतिसाद दिला.
या पोर्टलवर आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय राज्य व स्थानिक पातळीवरच्या ताज्या व महत्वाच्या बातम्या देण्याचा प्रयत्न अतिशय लोकप्रिय ठरला आहे. त्याचप्रमाणे विविध विषयांवरील साप्ताहिक लेखमाला, विशेष लेख, अक्षर कविता, राशीभविष्य, व्यंगचित्र, विज्ञान व तंत्रज्ञानातील ताजे अडपेटस, श्यामची आई संस्कारमाला आदी वाचकांच्या पसंतीस उतरले आहे.
‘भेट थेट’ मधून अनेकांचे व्यक्तिमत्व तसेच यशोगाथा समोर आल्या आहेत. लॅाकडाऊन हा सर्वांसाठी कठीण काळ ठरला. त्याचा फटका पत्रकारिता क्षेत्रालाही बसला. त्यात हे पोर्टल सुरु करण्याचे धाडस आम्ही केले. वाचकांनी त्यास उदंड प्रतिसाद देऊन मोठा आशीर्वादच दिला आहे. त्यामुळेच हा लाखमोलाचा टप्पा ओलांडता आला आहे.
गेल्या काही दिवसात ‘इंडिया दर्पण’वरील अनेक बातम्या राज्यपातळीवर गाजल्या आहेत. अनेक व्हीडीओ सुद्धा लोकप्रिय ठरले आहेत. तर, मुलाखतींची सर्वत्र चर्चा होत आहे. यापुढील काळातही वाचकांची अशीच सेवा करण्याचा मानस आहे. वाचक खंबीरपणे आमच्या पाठीशी राहतील असा दृढ विश्वास आम्हाला आहे.