नाशिक – अल्पावधीत इंडिया दर्पण लाईव्ह या वेब न्यूज पोर्टलने अठरा लाख दर्शकांचा (व्ह्यूज) टप्पा पार केल्यानंतर आता इंडिया दर्पण मीडिया हाऊसने पुस्तक प्रकाशन क्षेत्रातही पाऊल टाकले आहे.
इंडिया दर्पण मीडिया हाउस प्रकाशनाचे पहिले पुस्तक अनवट वाट स्टेशनमास्तरची हे आज वाचकांच्या भेटीला येत आहे. शंकर सातपुते यांचे आत्मचरित्र असलेले हे पुस्तक सर्वांना मार्गदर्शक ठरणारे असे आहे.
९४ मराठी साहित्य संमेलन व विद्रोही साहित्य संमेलन नाशिकमध्ये होत असतांना साहित्य क्षेत्रात धूम करणारे हे पुस्तक आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक अशोक पानवलकर यांची प्रस्तावना या पुस्तकात आहे.
इंडिया दर्पण प्रकाशनामुळे नवोदित साहित्यांकाना एक नवीन व्यासपीठ मिळाले आहे. आतापर्यंत इंडिया दर्पण न्यूज पोर्टलने कोणताही गाजावाजा व जाहिरात न करता सात महिन्यापूर्वी हे पोर्टल सुरु केले. शहराबरोबरच ग्रामीण भागातही या न्यूज पोर्टलला उदंड पसंती मिळाली आहे. विशेष म्हणजे हे पोर्टल व्यावसायिक पातळीवरही यशस्वी ठरले आहे. जगभरातील विविध ब्रँण्डेड कंपनीच्या जाहिराती गुगलच्या माध्यमातून या पोर्टलवर दीड महिन्यातच सुरु झाल्या. तर स्थानिक जाहिरातदारांनी सुद्धा तितकाच प्रतिसाद दिला.
या पोर्टलवर आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय राज्य व स्थानिक पातळीवरच्या ताज्या व महत्वाच्या बातम्या देण्याचा प्रयत्न अतिशय लोकप्रिय ठरला आहे. त्याचप्रमाणे विविध विषयांवरील साप्ताहिक लेखमाला, विशेष लेख, अक्षर कविता, रंजक गणित, राशीभविष्य, व्यंगचित्र, विज्ञान व तंत्रज्ञानातील ताजे अडपेटस, संस्कारमाला आदी वाचकांच्या पसंतीस उतरले आहे.
‘भेट थेट’ मधून अनेकांचे व्यक्तिमत्व समोर आले. तर काहींची कामगिरी व यश सर्वांपर्यंत पोहचले. लॅाकडाऊन हा सर्वांसाठी कठीण काळ ठरला. त्याचा फटका पत्रकारिता क्षेत्रातालाही बसला. त्यात हे पोर्टल सुरु करण्याचे धाडस आम्ही केले. वाचकांनी त्यास उदंड प्रतिसाद देऊन मोठा आशीर्वादच दिला आहे. त्यामुळेच हा अठरा लाखाचा टप्पा ओलांडता आला आहे. आता पुस्तक प्रकाशन क्षेत्रातही असे टप्पे इंडिया दर्पण गाठणार आहे.
अॅानलाईन पुस्तकासाठी या लिंकला क्लिक करा
- पाने २३६, किंमत २५० , सवलतीच्या दरात – १५० रुपये