नाशिक – इंडियन आईस्क्रीम मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारिणी बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षपदी स्कूप्स् आईस्क्रीम हैदराबादचेसुधीर शहा व राष्ट्रीय सचिवपदी फन इंडिया डेअरीचे आशिष नहार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नहार यांच्या निवडीने महाराष्ट्र राज्याला प्रथमच या शिखर संस्थेवर प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला आहे.
इंडियन आईस्क्रीम मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ही आईस्क्रीम उत्पादन व त्यासाठी लागणारा कच्चा माल व मशिनरी उत्पादन करणा-या उद्योगांचे प्रतिनिधित्व करते. या कार्यकारिणीमध्ये विविध समित्यांच्या माध्यमातून शासकीय व निमशासकीय स्तरावर भारतीय सरकारकडून कामे करून उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण तयार करण्यास प्रयत्न करते. दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्रदर्शन आयोजित करून सर्व आईस्क्रीम उद्योगांशी निगडित उत्पादकांना आपले उत्पादन सादर करण्याची संधी उपलब्ध करून देत असते. या कार्यकारिणीमध्ये महाराष्ट्रातून नॅचरल्स आईस्क्रीम मुंबईचे गिरीष पै यांची वेस्ट इंडिया झोनचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तसेच ईस्ट झोनचे उपाध्यक्षपदी कोलकत्याचे अनुव्रत पबराई, नॉर्थ झोन उपाध्यक्षपदी पंजाबचे चरणजित बसंत व साऊथ झोन उपाध्यक्षपदी कर्नाटकचे बालाराजू यांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय खजिनदारपदी बैंगलुरूचे प्रदिप पै यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नहार यांनी मागील वर्षी राष्ट्रीय कार्यकारिणीची वाषिर्क सभा नाशिक येथे आयोजित केली होती व चेन्नई येथील प्रदर्शनाचे राष्ट्रीय समन्वय म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन आयोजित केले होते. आईस्क्रीम वरील १८% जीएसटी चा विषय तसेच अन्न औषध प्रशासन व दळणवळण मंत्रालय येथे पाठपुरावा करून नहार यांनी प्रश्न मार्गी लावले आहेत. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
भारतीय आईस्क्रीम उद्योगांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ खुली करून जास्तीत जास्त निर्यात देशातून व्हावी यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे श्री. आशिष नहार यांनी यावेळी सांगितले. तसेच पुढील वर्षी असोसिएशनच्या वतीने युरोपमध्ये प्रदर्शन भरविणार असल्याची त्यांनी माहिती दिली. महाराष्ट्र राज्याला प्रथमच हा मान मिळाला असल्याने शासनाकडून राज्यात आईस्क्रीम उद्योगांसाठी स्वतंत्र क्लस्टर तसेच फुड पार्क व्हावा व शेतक-यांना दूधाचे योग्य भाव मिळावे यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी सांगितले.
नहार यांनी असोसिएशनसाठी केलेल्या कामाची ही पावती असल्याचे माजी अध्यक्ष वाडीलालचे राजेश गांधी यांनी सांगितले. या निवडीचे हॅटसन चेन्नईचे चंद्रमोगन, कटक्र\ॉस्टी आईस्क्रीमचे हसन अली, बैंगलूरू फॅब आईस्क्रीमचे नरसिंमन, टॉप अॅण्ड टाऊन भोपाळचे अरुण रामाणी आदिंनी या निवडीचे स्वागत केले आहे.