नवी दिल्ली – केंद्रीय पोलाद मंत्रालयाच्या अंतर्गत सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. या मंत्रालयांतर्गत भारत सरकारच्या नऊ कंपन्यांपैकी एक एनएमडीसी लिमिटेडने कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी पदावर भरतीसाठी जाहिरात दिली आहे.
कंपनीने जाहीर केलेल्या रोजगार भरती अधिसूचनेनुसार खाण विभाग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिलमधील कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवार एनएमडीसीच्या अधिकृत वेबसाइट nmd. co.in (एनएमडीसी.कॉम.इन ) वर उपलब्ध केलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात.
आजपासून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून दि. 23 मार्च 2021 पर्यंत उमेदवार आपला अर्ज सादर करु शकतील. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर संस्थांकडून रिक्त असलेल्या संबंधित शाखेचा तीन वर्षांचा डिप्लोमा किंवा पदवी पास केली असावी.
उमेदवारांना संबंधित क्षेत्रात किमान पाच वर्षांचा अनुभव असावा. याशिवाय उमेदवारांचे वय 32 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, अनुसूचित जाती, एसटी आणि ओबीसी उमेदवारांसाठी शासनाच्या नियमांनुसार जास्तीत जास्त वयोमर्यादेमध्ये सवलत देण्याची तरतूद आहे.
अधिक माहितीसाठी, भरती सूचनेसाठी खालील लिंक किंवा वेबसाईटला भेट द्या.
https://nmdcjo.formflix.com/
उमेदवार एनएमडीसीच्या करिअर लिंकवर किंवा वरील दिलेल्या थेट लिंकवरून ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्जाच्या वेळी उमेदवारांना 250 रुपये अर्ज फीदेखील सादर करावा लागेल, जो ऑनलाईन पद्धतीने भरता येतो.
संगणक-आधारित ऑनलाइन चाचणी आणि पर्यवेक्षी कौशल्य चाचणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना सुमारे 18 महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यांना दरमहा सुमारे 37 हजारांचे वेतन दिले जाईल. प्रशिक्षण घेतल्यानंतर उमेदवारांना 37,000 ते 1,30,000 रुपयांचा पगार मिळू शकतो.