नागपूर : इंग्लंडहून नागपूर येथे विमानाने आलेल्या एका २८ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाली आहे. त्याच्यावर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान, या युवकाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या परिवारातील काही जणांदेखील याची लागण झाली आहे. सदर युवक हा नोकरी निमित्त इंग्लंडला गेला होता. त्यानंतर मागील महिन्याच्या अखेरीस तो नागपूर येथे आला असता त्याची नागपूर विमानतळावर कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र ती निगेटिव्ह आली होती. त्यानंतर पुन्हा चाचणी केली असता ती पॉझीटिव्ह आल्याने त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. मात्र या बाधित युवकामार्फत कोरोनाच्या नव्या विषाणूचा राज्यात शिरकाव झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.