लंडन : पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी इंग्लंडमध्ये शनिवारी ३१ ऑक्टोंबरपासून २ डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले. वैद्यकिय तज्ञांनी व्यक्त केलेल्या भीतीनंतर त्यांनी हा निर्णय घेतला असून तज्ञांनी कठोर कारवाई न झाल्यास डिसेंबरपर्यंत कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, इंग्लंडमधील कोरोना प्रकरणाने दहा लाखांचा टप्पा ओलांडला आहे. येथील वैज्ञानिक सल्लागारांनी असा इशारा दिला आहे की, कोरोनो विषाणूच्या वारंवार वाढ होणाऱ्या रूग्णांमुळे रूग्णालयात दाखल झालेले रुग्ण आणि मृत्यू लवकरच गंभीर धोक्याची पातळीला ओलांडू शकतात. सरकारच्या वैज्ञानिक सल्लागार गटाचे सदस्य एपिडेमिओलॉजिस्ट जॉन एडमंड्स म्हणाले की, या महिन्याच्या सुरुवातीस निर्माण झालेल्या सर्वात वाईट परिस्थितीमुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी रुग्ण संक्रमणाच्या पातळीवर आधारित ब्रिटनसाठी स्थानिक निर्बंधांची एक प्रणाली आणली, परंतु काही शास्त्रज्ञ म्हणतात की हे पुरेसे नाही. टाईम्स ऑफ लंडनच्या वृत्तानुसार, जॉन्सनने सोमवारी महिनाभर लॉकडाऊन जाहीर केले. नवीन लॉकडाउनमध्ये अनावश्यक व्यवसाय बंद करण्याची मागणी केली आहे. लोकांना घरीच राहण्यास सांगितले आहे. तथापि, शाळा आणि विद्यापीठे खुली राहतील. यूकेमध्ये दिवसात २० हजारांहून अधिक कोरोना विषाणूची प्रकरणे आढळतात. पंतप्रधान जॉन्सन म्हणाले, युरोपमधील बर्याच भागात व्हायरसचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. जर लॉकडाउन सारखे निर्बंध लवकर लावले नाहीत, तर आपण आपल्या देशात दररोज हजारो मृत्यू पाहू शकतो. शनिवारी सायंकाळी अधिकृत शासकीय निवेदनात म्हटले आहे की, इंग्लंडमध्ये ३१ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२० दरम्यान १,०११,६६० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत २१,९१५ नवीन प्रकरणे नोंदवली गेली आणि ३२६ मृत्यू झाले.