गुवाहाटी – देशातील पाच राज्यात निवडणूक धुराळा असला तरी सध्या आसाममधील एका उमेदवाराची देशभरात चर्चा होत आहे. निमित्तही तसेच आहे. आसामच्या स्थानिक यूनायटेड पीपल्स पार्टी लिबरलचे उमेदवार मनारंजन ब्रम्हा त्यांच्या संपत्तीमुळे चर्चेत आहेत. कारण ब्रम्हा हे आसामच्या निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. ब्रम्हा यांनी आपली २६८ कोटींची संपत्ती जाहीर केली आहे. यामध्ये त्यांच्याकडील ४२९ गाड्यांचा देखील समावेश आहेत.
ब्रह्मा हे आसाममधील कोक्राझार (पश्चिम) विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. निवडणूक शपथपत्रात त्यांनी २६८ कोटींची संपत्ती जाहीर केली आहे. यामध्ये त्यांच्याकडे ४२९ गाड्या असून ३२० बँक खात्यांचा समावेश आहे.









