सी-हॉर्स
सी-हॉर्स हा एक समुद्री जीव आहे, आणि तो सरड्यापेक्षाही वेगाने रंग बदलतो. केवळ भीतीपोटीच नव्हे तर आपल्या भावना व्यक्त करतानाही सी-हॉर्स रंग बदलतात. यांच्या शरीरातील क्रोमेटेफोर्स नामक एक तत्व यांना वेगाने आणि विविध प्रकारचे रंग बदलवण्यासाठी मदत करतो. भीती वाटल्यास हे क्षणार्धात रंग बदलतात तर आपल्या जोडीदाराशी मिलनाच्या दरम्यान हळू हळू रंग बदलतात.
गोल्डन टॉरटॉइज बीटल
हा एक छोटासा किडा आहे. जर कुणी मानव किंवा इतर जीव या किटकाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असेल तर हा जीव त्त्वरीत आपला रंग बदलतो. भीतीपोटी आपला रंग बदलून हा किडा आजूबाजूच्या निसर्गामध्ये – म्हणजेच एखाद्या फुल किंवा पानाशी समरस होतो. आपल्या जोडीदाराशी मिलनाच्या दरम्यानसुद्धा हे कीटक आपला रंग बदलतात. यांचा सामान्य रंग सोनेरी असतो मात्र मिलनाच्या वेळी हे लाल रंग धारण करतात.
मिमिक ऑक्टोपस
मिमिक ऑक्टोपस देखील एक समुद्री जीव आहे, ज्याला रंग बदलण्याचे वरदान प्राप्त झालेले आहे. हा जीव बुद्धिमान समुद्री जिवांपैकी एक मानला गेला आहे. मुख्यत्त्वे करून हे जीव प्रशांत महासागरात सापडतात. आजूबाजूच्या रंगांशी जुळवून घेण्यासाठी हे स्वतःला तो रंग धारण करतात. शिवाय लवचिक त्वचा असल्यामुळे हे आकारसुद्धा बदलू शकतात.
पेसिफिक ट्री फ्रॉग
हे एक बेडूक असून उत्तर अमेरिकेत आढळून येते. रंग बदलण्याची कला याला सुद्धा अवगत आहे. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाताना ही कला यांच्या उपयोगी येते. आजूबाजूला कुणी शिकारी असल्याची चाहूल लागताच हे बेडूक आपला रंग बदलून जवळच्या झाड, पाने किंवा वनस्पतीन्सारखा करतात आणि बाजूच्या वातावरणात मिसळून जातात. इतकेच नव्हे तर बदलत्या ऋतूनुसार रंग बदलणे हीदेखील या बेडकाची एक खासियत आहे.
स्कॉर्पियन फिश
स्कॉर्पियन फिश स्वतः शिकार करताना तसेच इतर शिकाऱ्यांपासून स्वतःचा जीव वाचवण्या साठी रंग बदलते. ही मासोळी अतिशय विषारीसुद्धा आहे.