नवी दिल्ली – आजच्या काळात भ्रष्टाचार ही जागतिक पातळीवरची मोठी समस्या बनली आहे, मात्र आपल्या देशात भ्रष्टाचार जणू शिष्टाचार बनला आहे. त्यामुळेच भ्रष्टाचाराबाबत सर्वेक्षण करणाऱ्या ‘ट्रान्सपरन्सी इंटरनेशनल’ या संस्थेच्या नव्या अहवालानुसार, आशियाई देशांमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचारी किंवा लाचखोर भारतात आहेत. त्यामुळेच भारताचा क्रमांक सर्वात वरचा आहे.
ग्लोबल करप्शन बैरोमीटर (जीटीबी) मार्फत आशियाई देशांत भ्रष्टाचाराबाबत सर्वेक्षण करण्यात आले. त्यात भारतभरात या वर्षाच्या १७ जून ते १७ जुलै २०२० दरम्यान सर्वेक्षण करण्यात आले. त्यात २० लाख जण समाविष्ट झाले होते. सार्वजनिक व वैयक्तिक पातळीवर माहिती देताना सुमारे ५० टक्के लोकांनी असे सांगितले की, खासगी व सार्वजनिक कामांसाठी आम्हाला लाच द्यावी लागली. तर ३२ टक्के लोकांनी असे सांगितले आहे की, त्यांनी कोणत्याही कामांसाठी लाच दिली नाही. या अहवालात नमूद केले आहे की, खासगी क्षेत्रामध्ये लाच देण्याचे प्रमाण ३९ टक्के आहे. तर शासकिय क्षेत्रातील लाच घेणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त म्हणजे ४६ टक्के इतकी आहे,
तसेच या अहवालात नमूद केले आहे की, केंद्र आणि राज्य सरकारांच्या लोकांसाठीच्या सेवांमध्ये प्रशासकीय प्रक्रियेत सुधारणा करणे आवश्यक आहे. तसेच समानता व बंधूभाव वाढवून अत्याचार निवारक उपाय लागू करणे आणि सर्वसामान्य लोकांची कामे त्वरित करणे आवश्यक आहे. प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. या अहवालानुसार भारत, मलेशिया, थायलंड, श्रीलंका आणि इंडोनेशिया अनेक महिला-पुरुष अधिक भ्रष्टाचारी आहेत. भारतातील ८९ टक्के लोकांचे असे मत आहे की, आपल्या देशातील भ्रष्टाचार ही एक मोठी समस्या आहे, आणि समारे ६३ टक्के लोकांच्या मते, भ्रष्टाचारातून देशातील सरकारचे काम चालू आहे, तर सुमारे ७३ टक्के लोक असे म्हणाले की, भ्रष्टाचार विरोधी लढाई करणाऱ्या संघटना चांगली कामगिरी करत आहेत. या सर्वेक्षणात १७ देशांमधील सुमारे नागरिक समाविष्ट झाले. या अहवालानुसार भारत नंतरचे भ्रष्टाचारात दुसरे स्थान कंबोडिया देशाचे आहे, तेथे भ्रष्टाचाराचे प्रमाण ३७ टक्के आहे. त्यानंतर इंडोनेशिया (३० टक्के) , मालदीव आणि जपान (२६ टक्के) दक्षिण कोरियामध्ये १० टक्के आणि नेपाळमध्ये १२ टक्के भ्रष्टाचाराचे प्रमाण आहे.