मुंबई – महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाने आज आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण निवड समितीची बैठक पार पडली. यावेळी आशा भोसले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आशाताईंचे आभार मानले. आशा भोसले यांचे संगीत क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांनी असंख्य मराठी आणि हिंदी गाणी गायली आहेत. त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. राज्य सरकारकडून १९९६ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. पहिला पुरस्कार पु. ल. देशपांडे यांना देण्यात आला होता. तर दुसरा पुरस्कार १९९७ मध्ये गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांना देण्यात आला होता.