शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आले स्कॅनिंगचे भारतीय अॅप; मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांचे संशोधन

by India Darpan
ऑगस्ट 31, 2020 | 1:28 am
in राज्य
0
IIT1

मुंबई – केंद्र सरकारने ५९ चीनी मोबाईल ॲप बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्कॅनिंगसाठी आयआयटी मुंबईच्या रोहित कुमार चौधरी, केविन अग्रवाल या विद्यार्थ्यांनी ॲप तयार केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ आव्हानातून प्रेरणा घेऊन या विद्यार्थ्यांनी हे मोफत ॲप तयार केले आहे.

एआयआर स्कॅनर (AIR Scanner) असे मोबाईल ॲपचे नाव असून त्याचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारीत (Artificial Intelligence) ॲप कागदपत्रं स्कॅन करण्याबरोबरच ज्यांना इंग्रजी वाचनात अडचण आहे, त्यांच्यासाठी कागदपत्रांचे वाचन करेल.

या ॲपविषयी सांगताना रोहित कुमार चौधरी म्हणाले, “सुरुवातीला आम्ही ज्यांना इंग्रजी वाचन कठीण जाते, त्यांच्यासाठी ॲप तयार करण्यावर काम करत होतो. त्याच दरम्यान सरकारने मोबाईल स्कॅनरसह चिनी कंपन्यांच्या ॲपवर बंदी घातली. कॅम स्कॅनर या ॲपवर बंदी घातल्यानंतर आम्ही सर्वेक्षण केले की, लोकांना मोबाईल फोनच्या माध्यमातून कागदपत्रं स्कॅन करण्यास अडचणी येत आहेत. त्यानंतर आम्ही आमच्या एआयआर ॲपमध्ये स्कॅनिंग जोडण्याचा निर्णय घेतला”.

या ॲपचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे याची सुरक्षितता आहे. तुम्ही मोबाईल कॅमेऱ्याने स्कॅन केलेली कागदपत्रं पीडीएफ स्वरुपात जतन केली जातात. एआयर स्कॅनर ॲप वापरकर्त्यांची कोणतीही माहिती गोळा करत नाही आणि सर्व कागदपत्रे फोनच्या लोकल स्टोअरेजमध्ये साठवली जातात. यासाठी आम्ही क्लाऊड स्टोअरेजचा वापर करत नाही. त्यामुळे यात वापरकर्त्यांच्या सुरक्षेची पूर्ण हमी आहे, असे रोहित कुमार म्हणाले.

प्ले स्टोअरवर आतापर्यंत १५०० जणांनी हा ॲप डाऊनलोड केला आहे. सध्या ॲप अँड्रॉईड फोनधारकांसाठी उपलब्ध आहे, लवकरच तो आयओएस वापरकर्त्यांनाही उपलब्ध करुन दिला जाणार आहे.  ॲप डाऊनलोड करण्यासाठी: https://play.google.com/store/apps/details?id=com.hind.airscanner या संकेतस्थळाला भेट द्यावी.

IIT4 IIT5

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सोमवारचा कॉलम- स्टार्टअप की दुनिया – दोन तरुण अन् ‘मीशो’चा जन्म

Next Post

हेच बाकी होते. चक्क मृतदेहांची आदलाबदल

Next Post

हेच बाकी होते. चक्क मृतदेहांची आदलाबदल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
cbi

सीबीआयने बनावट नोटा प्रकरणातील या आरोपीला इंटरपोल चॅनेलद्वारे युएईहून परत आणले…

जून 20, 2025
Governor releases book 01 51 1024x615 1

रा. स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना…राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

जून 20, 2025
cm dharangaon 1024x684 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

जून 20, 2025
Untitled 68

लोकलमध्ये महिलांची हाणामारी, बघा, सोशल मीडियामधील व्हायरल व्हिडिओ

जून 20, 2025
jilha parishad

एमएसआरडीसीच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात नाशिक झेडपीत फसवणुकीचा गुन्हा

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011