नवी दिल्ली – जगप्रसिद्ध अॅपल कंपनीचे भारतातील पहिले ऑनलाईन स्टोअर २३ सप्टेंबरपासून सेवेत दाखल होणार आहे. अॅपलच्या म्हणण्यानुसार, आता ग्राहक कंपनीच्या या विशेष ऑनलाइन स्टोअरमधून थेट उत्पादन खरेदी करू शकणार आहेत. भारतात प्रथमच अॅपलचे पहिले ऑनलाईन स्टोअर सुरु होणार आहे. आतापर्यंत भारतात उत्पादने अधिकृत स्टोरेजवर किंवा ई-कॉमर्स वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली. परंतु आता प्रथमच ऑनलाईन स्टोअरची मुहूर्तमेढ रोवली जात आहे.
ऑनलाईन स्टोअर ग्राहकांना जगभरातील स्टोअरप्रमाणेच प्रीमियम अनुभव देण्याचा प्रयत्न याद्वारे होणार असल्याचे अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी म्हटले आहे. ऑनलाइन स्टोअरमधून ग्राहकांना हिंदी व इंग्रजी भाषेत उत्पादनांची माहिती मिळणार आहे. सणाच्या काळात उत्पादनांमध्ये विशेष सूट देण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले आहे. हिंदी, इंग्रजी, बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, तामिळ आणि तेलगू भाषांमध्ये उत्पादनाची माहिती घेता येणार आहे. यासंबंधित अधिकृत माहिती ट्विटरद्वारे देण्यात आली आहे.