नवी दिल्ली – संपूर्ण भारतवासिय ज्या एका घटनेची डोळ्यात तेल घालून वाट पाहत आहेत ती घटिका आता समीप आली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात देशभरात कोरोना लसीकरण सुरू होणार आहे. तसे संकेत आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिले आहेत. कोरोना लसीचा पहिला डोस देण्यास प्रारंभ केला जाणार असून त्यासाठीची सर्व तयारी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले असून त्यात म्हटले आहे की, मला वैयक्तिकरित्या वाटते की, कदाचित जानेवारीच्या काही आठवड्यात आम्ही लसीकरणास सुरुवात करु. आमची पहिली प्राथमिकता ही लसीची सुरक्षा आणि त्याची परिणामकारकता ही आहे. यासंदर्भात कुठलीही तडजोड करण्यास आम्ही तयार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.