रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आली रे आली!!! नाशिकमध्ये कोरोना लस दाखल; शनिवारपासून लसीकरण

by India Darpan
जानेवारी 13, 2021 | 7:13 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
कोरोना लस

कोरोना लस


नाशिक – कोविड-१९ महामारीच्या प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनामार्फत अनेक उपाय योजना करण्यात येत आहेत. या उपायोजनातील एक महत्वाचा घटक म्हणजे कोविड महामारीच्या प्रतिबंधासाठी तयार करण्यात आलेली लस आहे.  सिरम इन्स्टीट्युट ऑफ इंडिया, पुणे या कंपनीची ‘कोविड शिल्ड’ लसीचे जिल्ह्यासाठी ४३ हजार ४४० डोसेस उपलब्ध करून देण्यात आले असून महानगरपालिका व ग्रामीण भागातील एकूण १६ लसीकरण केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे आणि १६ जानेवारीपासून लसीकरणास सुरूवात करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

IMG 20210113 WA0007
सिरम इन्स्टीट्युट ऑफ इंडिया, पुणे या कंपनीची ‘कोविड शिल्ड’ लसीचे 9 लाख 36 हजार 50 डोसेजेस राज्यासाठी प्राप्त झाले असून त्यापैकी नाशिक  जिल्ह्यासाठी 43 हजार 440 डोसेजेस आज प्राप्त झाले आहेत.  कोविड-19 लसीकरणासाठी जिल्हा रुग्णालय नाशिक, सामान्य रुग्णालय मालेगाव, उपजिल्हा रुग्णालय कळवण, उपजिल्हा रुग्णालय निफाड, उपजिल्हा रुग्णालय चांदवड, उपजिल्हा रुग्णालय येवला, ग्रामीण रुग्णालय दिंडोरी, नाशिक तालुक्यातील सय्यद पिंपरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, इंदिरा गांधी हॉस्पिटल नाशिक,  शहरी आरोग्य केंद्र सातपुर नाशिक, शहरी आरोग्य केंद्र नवीन बिटको नाशिक, शहरी आरोग्य केंद्र जे. डी. सी बिटको नाशिक, शहरी आरोग्य केंद्र कॅम्प वॉर्ड मालेगाव, शहरी आरोग्य केंद्र निमा 1 मालेगाव, शहरी आरोग्य केंद्र रमजानपुरा मालेगाव, शहरी आरोग्य केंद्र सोयगाव, मालेगाव अशा महानगरपालिका व ग्रामीण भाग मिळुन जिल्ह्यात एकूण 16 ठिकाणी लसीकरणासाठी केंद्र निश्चित करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी सांगितले आहे.
लसीकरण केंद्रांवर आवश्यक तापमान निश्चित करून व्हॅक्सीन व्हॅनच्या सहाय्याने आज प्राप्त झालेल्या लसी वेळेत पोहचविण्यात येणार आहेत. जेणेकरून कोविड महामारीच्या प्रतिबंधासाठीचा शेवटचा टप्पा असणारे लसीकरण 16 जानेवारीपासून जिल्ह्यातील 16 केंद्रावर नियोजित केल्यानुसार सुरू करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी सांगितले आहे.
निवड करण्यात आलेल्या संस्थासाठी एक नोडल अधिकारी व प्रत्येक संस्थानिहाय पाच अधिकारी व कर्मचारी यांची टीम बनविण्यात आली असून या टिमने लसीकरण दरम्यान मास्क व ग्लोजचा वापर करणे अनिवार्य आहे. कोविड 19 लसीकरणासाठी तीन रूमची व्यवस्था करण्यात आली असून पहिल्या वेटींग रूममध्ये लाभार्थ्यांला 6 फुटांचे सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करून बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून यावेळी प्रत्येक लाभार्थ्यांचे तापमान घेण्यात येवून सॅनिटाइज केले जाईल. यानंतर दुसऱ्या व्हॅक्सिनेशनच्या रूममध्ये लाभार्थ्याची ओळखपत्रानुसार CoWin aap या ॲप्लिकेशनमध्ये नोंद करण्यात येवून त्याला लसीकरणाची संपूर्ण माहिती दिल्यानंतर त्याला लसीकरण करण्यात येईल. लसीकरण झाल्यावर तिसऱ्या ऑबझरव्हेशन रूममध्ये लाभार्थ्यांला 30 मिनिट परिक्षणासाठी बसविण्यात येणार आहे. या तिन्ही रूममध्ये कोविड 19 महामारीच्या प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या उपायोजनांच्या माहितीचे फलक प्रदर्शित करण्यात आलेले आहेत, अशी माहितीही जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी दिली आहे.
IMG 20210113 WA0006
जिल्ह्यात लसीकरणाच्या पहिल्या फेरीत एकूण 18 हजार 135 शासकीय व 12 हजार 480 खाजगी संस्थामधील आरोग्य कर्मचारी यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात आले असून जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार 29 लसटोचकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात कोविड 19 लसीकरण मोहिमेअंतर्गत  लस साठविण्यासाठी 210 आयएलआर उपलब्ध आहेत, असेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले आहे.
आज पर्यंत अनेकविध प्रतिबंधात्मक उपायांच्या वापर करून आपण या आजाराची व्याप्ती जिल्ह्याच्या केवळ एक ते दीड टक्के लोकसंख्या इतकीच मर्यादित ठेवण्यात यशस्वी झालो आहोत. आता लसीकरण झाल्यामुळे आपल्याला एक जास्त सक्षम सुरक्षा कवच मिळणार आहे व हे सुरक्षा कवच जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्ण क्षमतेने तयार असल्याचेही श्री मांढरे यांनी सांगितले.
येथे होणार लसीकरण
१. जिल्हा रुग्णालय नाशिक
२. सामान्य रुग्णालय मालेगाव
३. उपजिल्हा रुग्णालय कळवण
४. उप जिल्हा रुग्णालय निफाड
५. उपजिल्हा रुग्णालय चांदवड
६. उपजिल्हा रुग्णालय येवला
७. ग्रामीण रुग्णालय दिंडोरी
८. प्राथमिक आरोग्य केंद्र सय्यद पिंपरी
९. इंदिरा गांधी हॉस्पिटल नाशिक
१०. शहरी आरोग्य केंद्र सातपूर
११. शहरी आरोग्य केंद्र नवीन बिटको नाशिक
१२. शहरी आरोग्य केंद्र जेडीसी बिटको नाशिक
१३. शहरी आरोग्य केंद्र निमा 1 मालेगाव
१४. शहरी आरोग्य केंद्र रमजान पुरा मालेगाव
१५. शहरी आरोग्य केंद्र सोयगाव मालेगाव
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आता येतेय डिजिटल मतदार ओळखपत्र; असे मिळवा

Next Post

सोसायटी रजिस्टर करा आणि मालक व्हा; कसे? (बघा हा व्हिडीओ)

India Darpan

Next Post

सोसायटी रजिस्टर करा आणि मालक व्हा; कसे? (बघा हा व्हिडीओ)

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
cbi

सीबीआय न्यायालयाने या बँकेच्या दोन तत्कालीन व्यवस्थापकांसह चार आरोपींना तीन वर्षांची सुनावली सक्तमजुरीची शिक्षा

जून 22, 2025
nia11

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणात एनआयएने दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल २ जणांना केली अटक…

जून 22, 2025
Untitled 72

अमेरिकेने अणुस्थळांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी केला हल्ला

जून 22, 2025
trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011