नवी दिल्ली – एलजीने अनोखा फोन स्मार्टफोन बाजारात आणला आहे. एंट्री लेव्हल प्रीमियम फोन सेगमेंटमध्ये एलजी वेलवेट सादर करण्यात आला आहे. या यात ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज आहे. मोबाईलची किंमत ३६,९०० आहे. ३० ऑक्टोबर (उद्या)पासून बुकिंग सुरु होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. हा स्मार्टफोन देशभरातील आघाडीच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. व्हेलवेट स्मार्टफोन ब्लॅक आणि सिल्व्हर कलरमध्ये उपलब्ध आहे. ६.८ इंचाचा एच डी डिस्प्ले असून क्वालकॉम स्नैपड्रैगन ८४५ प्रोसेसर आहे. यात ४८ मेगा पिक्सल ट्रिपल लेअर कॅमेरा आहे.