नवी दिल्ली – मोटोरोलाचा नवीन स्मार्टफोन मोटो ई ७ प्लस विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर दुपारी १२ वाजता या डिव्हाइसची विक्री सुरू झाली आहे. स्पेसिफिकेशनबद्दल सांगायचे तर मोटो ई ७ प्लसमध्ये ५००० एमएएच बॅटरी आहे. या व्यतिरिक्त हँडसेटला तीन कॅमेरे आहेत.
मोटोरोला कंपनीतर्फे आज ३० सप्टेंबर रोजी हा नवीन मोबाईल लॉन्च करण्यात आला आहे. सर्व ई-कॉमर्स साइटवर हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध करून झाला आहे. मोटो ई ७ प्लसच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ९४९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन मिस्टी ब्लू आणि ट्वायलाइट ऑरेंज कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. ऍक्सिस बँकेच्या क्रेडिटकार्ड धारकांना पाच टक्के आणि अॅक्सिस बँक बझमधील ग्राहकांना पाच टक्के सूट देणार आहे. या व्यतिरिक्त, हे डिव्हाइस दरमहा १०५६ रुपये किंमतीच्या ईएमआयसह खरेदी करता येणार आहे. फीचर्सच्या बाबतीत, मोटो ई ७ प्लस रियलमीच्या नवीन डिव्हाइस रेडमी ९ ला स्पर्धा देत आहे. रेडमी ९ ची चर्चा केली तर त्याची किंमत ८९९९ रुपये आहे. यात ६.५३ इंचाचा एचडी डिस्प्ले आहे.
मोटो ई ७ प्लस संबंधी…
मोटो ई ७ प्लसमध्ये कंपनीने ६.५ इंचाचा व्हिजन एचडी डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ४६९ प्रोसेसरसह ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज आहे. मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढवण्याची सुविधा यात देण्यात आली आहे. याशिवाय या हँडसेटला ड्युअल कॅमेरा आहे. ४८ मेगापिक्सल लेन्स असून पुढील बाजूस ८ एमपीचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.