मुंबई – बिग बॉस १४ ची प्रतिस्पर्धी आर्शी खान होळीच्या एका कार्यक्रमासाठी गोव्याला निघाली होती. मुंबई विमानतळाच्या टर्मिनल २ वर ती पोहोचली. एका फोटोग्राफरने तिला पाहिलं. तीनेही मस्त त्याला पोझ वगैरे दिली. त्यानंतर तिला कळलं की, अरे आपली फ्लाईट तर टर्मिनल १ वरून आहे. मग तिची जी काही घाबरगुंडी उडाली, ते काही विचारू नका. टर्मिनल १ वर जाण्यासाठी म्हणून ती पुन्हा गाडीत जाऊन बसली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात आला आणि आता तो व्हायरल होतो आहे.
अर्शी खान सांगते की, होळीच्या कार्यक्रमासाठी ती गोव्याला जात होती. कॅमेऱ्यासमोर पोझ देत असताना सुद्धा ती बोललेले ऐकू येते. ती म्हणतेय, हे टर्मिनल २ आहे का?, माझी फ्लाईट तर टर्मिनल १ वरून आहे. आणि मग ती धावतपळत पुन्हा त्याच गाडीत जाऊन बसते, ज्यातून ती एअरपोर्टवर आली होती. हा मजेदार व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतो आहे.
अर्शी खानने नुकतेच मुंबईत एक घर घेतले आहे. यासाठी तिने सलमान खान याला धन्यवाद दिले आहेत. माझ्याकडे काहीच काम नव्हते, तेव्हा मी पैसे कसे कमावणार, अशी चिंता मला होती. पण त्यानंतर मला काही शो मिळाले, काही चित्रपटांत काम केले आणि बिग बॉस १४ मुळे देखील मला खूप मोठी मदत मिळाली. यामुळे मुंबईत घर घेण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले. यासाठी मला सलमान खानने देखील मदत केली.
बिग बॉस १४ मध्ये अर्शी खान खूपच सक्रिय होती. तिची मस्ती सगळेच एंजॉय करायचे. तिचे आणि विकास गुप्ताचे जोरदार भांडण व्हायचे. यातूनच एकदा विकासने आर्शीला स्विमिंग पुलात ढकलून दिले होते. यामुळे त्याला हा शो सोडावा लागला होता.