मुंबई – जनतेच्या आरोग्याच्या बाबतीत तडजोड करून चालणार नाही, त्यामुळे राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागातली ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातली पदं येत्या दोन महिन्यात भरली जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
कोविड काळात आरोग्य सेवेत तात्पुरते भरती झालेल्या लोकांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याबाबत आणि आरोग्य विभागातल्या रिक्त जागा भरण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते.