सुदृढ आरोग्यासाठी सर्वांनी नियमित व्यायाम करणे गरजेचे – कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर
…
नाशिक – सुदृढ आरोग्य आणि स्वास्थ्यपूर्ण जीवनासाठी सर्वांनी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ’फिट इंडिया फ्रिडम रन’ च्या उद्घाटनप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ’फिट इंडिया फ्रिडम रन’ उपक्रमाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी एन.व्ही. कळसकर, विद्यार्थी कल्याण विभागाचे प्र. संचालकसंदीप कुलकर्णी आदी मान्यवर सहभागी झाले होते.
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले की, सुदृढ आरोग्यासाठी नियमित धावणे, व्यायाम आणि योगा करणे गरजेचे आहे. पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून ’फिट इंडिया’ मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे. निरोगी व सुदृढ जीवनासाठी नियमित व्यायाम करावा. विविध शारिरीक हालचाली केल्याने मानसिक तणाव दूर होतात तसेच शरीरास बळकटी मिळते. आरोग्यसाठी शारिरीक कसरतीचा भाग महत्वपूर्ण असून स्वास्थ्यासाठी प्रत्येकाने व्यायाम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर यांनी सांगितले की, नियमित व्यायामाने शरीर तंदुरूस्त आणि मन ताजेतवाने राहते. व्यायाम हा आपला नित्याचा कार्यक्रम असला पाहिजे असे सांगितले. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सुदृढ आरोग्याचे महत्व व त्याचा प्रचार आणि प्रसार यासाठी विद्यापीठात ’फिट इंडिया फ्रिडम रन’चा शुभारंभ करण्यात आल्याचे सांगितले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्य संपर्क अधिकाÚयांनी निर्देशित केलेल्या वेळापत्रकानुसार राज्यातील सर्व संलग्नित महाविद्यालयात २ ऑक्टोबर पर्यंत उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक व स्वयंसेवकांकडून दोन ते तीन कि.मी. मॉर्निंग वॉक, धावणे, ई-पोस्टर कॅम्पेन, सायकलिंग, योगा व अन्य शारिरीक हालचाली आदी प्रकार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
’फिट इंडिया फ्रिडम रन’चा प्रारंभ विद्यापीठ प्रागणांत मा. कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. या कार्यक्रमाचे समन्वयन विद्यार्थी कल्याण विभागाचे प्र.संचालक संदीप कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. ’फिट इंडिया फ्रिडम रन’ मध्ये धुळयाचे ए.सी.पी.एम. दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण दोडामणी, विद्यापीठातील अधिकारी डॉ. सुनिल फुगारे, डॉ. उदयसिंह रावराणे, संजय नेरकर, राजेंद्र नाकवे, डॉ. आर.टी. आहेर, संजय मराठे, शंकर शिंदे, अनंत सोनवणे, राजेंद्र शहाणे, डॉ. संतोष कोकाटे, एम.एम. जॉन्सन, डॉ. प्रदीप आवळे, डॉ. दीपांजली लोमटे,महेश बिरारीस, डॉ. सचिन गायकवाड, युवराज भारंबे, नितीन काळे सहभागी झाले होते. या कार्यक्रमाकरीता बाळासाहेब पेंढारकर, किशोर पाटील, आबाजी शिंदे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात कोरोना संबधीत शासनाने निर्देशित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात आले.