नाशिक – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उपकुलसचिव श्री. संजय रामदास नेरकर यांना सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ’ऑरगनायझेशनल मॅनेजमेंट’ विषयात पीएच.डी. नुकतीच पदवी प्रदान करण्यात आली आहे. ’ऑरगनायझेशनल मॅनेजमेंट’ मधील ’अॅन एनालॅटिकल स्टडी ऑफ मॅनेजमेंट प्रॅक्टीस ऑफ नर्सिंग कॉलेजेस इन महाराष्ट्र’ हा शोध प्रबंधाचा विषय होता. राज्यातील सर्व विभागातील नर्सिंग महाविद्यालयात उपलब्ध सुविधा व प्रणालींचा त्यांनी अभ्यास केला. तद्नंतर त्याचे विश्लेषण करुन निष्कर्ष काढले आहेत. त्यांच्या शोध प्रबंधातील निष्कर्ष महाविद्यालयांना उपयुक्त ठरतील असे त्यांनी सांगितले. या संशोधनासाठी त्यांना अहमदनगर येथील इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज (करिअर डेव्हलपमेंट अॅण्ड रिसर्च) संस्थेचे संचालक डॉ. एम.बी. मेहता यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाबद्दल विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.