गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदी डॉ. नितीन करमळकर

by India Darpan
फेब्रुवारी 11, 2021 | 12:35 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210211 WA0004

नाशिक – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु पदाचा कार्यभार सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी ११ फेब्रुवारी रोजी स्विकारला आहे. मा. कुलपती कार्यालयाने आदेशित केल्यानुसार आरोग्य विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरु पदाचा कार्यभार डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी विद्यापीठाचा मानदंड देऊन डॉ.नितीन करमळकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
याप्रसंगी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले की, आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरु पदाचा कार्यभार स्विकारतांना मला आनंद होत आहे. विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्यात असून आरोग्य क्षेत्राशी निगडीत लोकांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली आहे. कोविड-19 च्या काळात विद्यापीठाने व विविध आरोग्य संस्थांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाबरोबर विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधनाचे कामकाज विद्यापीठातून यापुढे घडावे यासाठी मी प्रयत्नशील राहील असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, विद्यापीठाचे प्रभारी मा. कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांचे विद्यापीठ परिवाराच्या वतीने स्वागत करतो. मा. कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर व मा. प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले तसेच सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे. यापुढे प्रशासकीय कामकाजात आपणही मार्गदर्शन करावे जेणेकरुन विद्यापीठाची यशस्वीतेकडे जोमाने वाटचाल होईल असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मा. कुलगुरु आहेत. त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून भूगर्भशास्त्रात बीएस्सी केल्यानंतर त्यांनी एमएस्सीसाठी पुणे विद्यापीठात प्रवेश घेतला. पुढे ‘पेट्रोग्राफी जिओकेमेस्ट्री ऑफ अल्ट्रामफाइट्स फ्रॉम पार्टस ऑफ लडाख हिमालाय (विथ रेफ्रन्स टू क्रोमॅटिक मिनरलायझेशन)’ या विषयात पीएचडी प्राप्त केली. याच विषयाशी निगडीत बाबींवर त्यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनीत तसेच जर्मनीत संशोधन केले.
डॉ. करमळकर यांना उच्च शिक्षण क्षेत्रातील अध्यापन, प्रशासन, तसेच संशोधनाचा मोठा अनुभव आहे. पर्यावरण, भूगर्भशास्त्र, भूरसायनशास्त्र हे त्याचे संशोधनाचे विषय. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकांमधून त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. तसेच, परदेशातील काही संस्थांबरोबर सध्या संशोधन प्रकल्प सुरू आहेत. पाषाण हा त्यांचा अभ्यासाचा विषय असून, विविध प्रकारच्या अधिवासात आढळणाऱ्या पाषाणांवर त्यांचे संशोधन सुरू आहे. त्यांच्या कामाचा विविध संस्थांकडून आजवर गौरव करण्यात आला. त्यांचे विद्यार्थी आज वेगवेगळया देशांना मोठ्या पदांवर आहेत. त्याचे शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय कार्य असून ते आरोग्य विद्यापीठाच्या वाटचालीत त्यांची भूमीका महत्वाची असणार आहे.
विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर व प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर यांच्या पदाचा कार्यकाळ आज रोजी संपुष्टात आला आहे. विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरु पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी विद्यापीठाचे प्रशासकीय कामकाज व कार्यप्रणालीबद्दल सादरीकरणाव्दारे मा. प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी थोडक्यात माहिती दिली.
याप्रसंगी व्यासपीठावर विद्यापीठाचे मा. परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी श्री. एन.व्ही. कळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. राजश्री नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. अधिसभागृहात मा. प्रभारी कुलगुरु यांच्या अध्यक्षेतेखाली बैठकीत विद्यापीठातील सर्व विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार रंगनाथ पठारे यांना जाहीर

Next Post

कळवण – रोटरी क्लबतर्फे शिक्षकांना नेशन बिल्डर्स अवॉर्ड देऊन सन्मानित.

India Darpan

Next Post
IMG 20210211 WA0024

कळवण - रोटरी क्लबतर्फे शिक्षकांना नेशन बिल्डर्स अवॉर्ड देऊन सन्मानित.

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011