नाशिक – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मा. कुलगुरु निवडीसाठी गठीत करण्यात येणाऱ्या समितीसाठी विद्यापीठाच्या अधिकार मंडळ सदस्यांकडून भारतीय आयुर्विज्ञान परिषदेचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांची निवड करण्यात आली आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या विद्यापीठाच्या मा. व्यवस्थापन परिषद व मा. विद्यापरिषदेच्या संयुक्त बैठकीत मा. कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर अध्यक्षस्थानी होते. समवेत मा. प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांचा कुलगुरु पदाचा कार्यकाळ माहे फेब्रुवारी २०२०१ मध्ये संपुष्टात येत आहे. विद्यापीठ अधिनियमात नमुद केल्याप्रमाणे पुढील कालावधीसाठी विद्यापीठाचे मा. कुलगुरु निवडी करीता शासनाकडून गठीत करण्यात येते. याकरीता विद्यापीठ अधिकार मंडळातील सदस्यांकडून एक व्यक्तीचे निवड करण्यात येते. या अनुषंगाने विद्यापीठाचे मा. व्यवस्थापन परिषद व मा. विद्यापरिषद सदस्यांची संयुक्त बैठक संपन्न झाली. या बैठकीत मा.सदस्यांकडून नवी दिल्ली येथील भारतीय आयुर्विज्ञान परिषदेचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया आणि जयपूर येथील राष्ट्रीय आयुर्वेद संस्थानचे संचालक प्रा. डॉ. संजीव शर्मा यांचे नाव सुचीत करण्यात आले होते.
ते पुढे म्हणाले की, मा. कुलगुरु निवडीकरीता गठीत समितीसाठी एक व्यक्तीचे नांव पाठविणे क्रमप्राप्त आहे. या अनुषंगाने अधिकार मंडळ सदस्यांनी सुचविलेल्या नांवासाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणूकीत डॉ. रणदीप गुलेरिया यांना सर्वाधिक मते मिळाले आहेत असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठ अधिकार मंडळाच्या संयुक्त बैठकीसाठी डॉ. सचिन मुंब्रे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. राजश्री नाईक, डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. सुधीर देशमुख, डॉ. राजेश गोंधळेकर, डॉ. राजश्री नाईक, डॉ. अजीत गोपछडे, डॉ. अजय चंदनवाले, डॉ. सुषमा पांडे, डॉ. रामानंद जयप्रकाश, डॉ. उदय मोहिते, डॉ. सुभाष भोयर, डॉ. विजय उखळकर, डॉ. अभय पाटकर, डॉ. शाहिदा रहेमानी, डॉ. बाळासाहेब पवार, डॉ. प्रताप भोसले, डॉ. मंगेश जतकर, डॉ. मोहम्मद हुसैन, डॉ. मृणाल पाटील, डॉ. वर्षा जाधव, डॉ. धमेंद्र शर्मा, डॉ. संगीता पळसकर, डॉ. यशवंत पाटील, डॉ. मनिष इनामदार, डॉ. श्रीचक्रधर मुंगल, डॉ. आर. टी. आहेर आदी सदस्यांनी प्रक्रियेत सहभाग घेतला.
या निवडणूक प्रक्रियेत कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण निवडणूक निर्णय अधिकारी होते समवेत परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, श्री. एन.व्ही. कळसकर, विधी अधिकारी श्री. संदीप कुलकर्णी, डॉ. उदयसिंह रावराणे, श्री. राजेंद्र नाकवे, श्री. संदीप राठोड, श्री. गजानन सूर्यवंशी, श्रीमती रंजना देशमुख, श्रीमती शैलजा देसाई, श्री. संजय सुराणा, श्री. सोळसे मोहन सोळसेयांनी सहाय्य केले. विद्यापीठ शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीच्या धन्वंतरी सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कोविड-19 आजाराची परिस्थिती पहाता शासनाने आदेशित केलेल्या निर्देशाचे पालन करण्यात आले.