शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आरोग्य विज्ञान विद्यापीठात मेडिकल कॉलेज व पदव्युत्तर संस्था; अहवाल तयार करण्याचे निर्देश

by India Darpan
सप्टेंबर 4, 2020 | 2:04 am
in राज्य
0
minister ami

मुंबई – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने विद्यापीठ परिसरात नवीन वैद्यकीय पदवी महाविद्यालय व वैद्यकीय पदव्युत्तर संस्था तसेच आयुर्वेद, होमिओपॅथी आणि भौतिकोपचार पदवी महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा परिपूर्ण अहवाल तयार करून विभागास सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिलीप म्हैसेकर यांना बुधवारी (२ सप्टेंबर) दिले.

 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कामकाजासंदर्भातील आढावा बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिलीप म्हैसेकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, टाटा मेमोरियल सेंटरचे डॉ. कैलास शर्मा, रिलायन्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. गुस्ताद डावर यांच्यासह विद्यापीठाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत विद्यापीठ कामकाजाचे सादरीकरण, तसेच विद्यापीठाचे प्रस्तावित पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय,आयुर्वेदिक, होमियोपॅथी महाविद्यालयांना स्थापनेच्या अनुषंगाने आढावा आणि सादरीकरण तसेच विद्यापीठाने कोविड -१९ च्या अनुषंगाने विद्यापीठाने केलेली कामे याबाबत आढावा घेण्यात आला.

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठासाठी आकृतिबंध मंजूर करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ विद्यापीठाच्या निधीतून शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांची पदे तयार करू शकते का, विद्यापीठाचे प्रादेशिक केंद्र चालविण्यासाठी राज्य शासनाने जमीन देणे,विद्यापीठ डॉक्टरांच्या लोकसंख्येच्या अनुषंगाने अनुज्ञेय ब्रुहत आराखडा तयार करण्यात यावा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात फिजिओथेरपी, नर्सिंग, व्यावसायिक थेरपी महाविद्यालय सुरु करण्याचे निर्देश देण्याबरोबरच राज्य शासन वैद्यकीय, आयुर्वेद, होमिओपॅथी महाविद्यालयाचे आरोग्य विज्ञान शिक्षण केंद्राचे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संकुल कसे होईल, कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण कशी करता येईल याबाबत अहवाल तयार करावा असे निर्देश दिले.

राज्यस्तरीय मान्यताप्राप्त महाविद्यालयासाठी रेटिंग दिले जाऊ शकते का, विद्यार्थी व शिक्षकांना ऑनलाईन सेवा सुविधा कशा देता येतील, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा विमा कसा काढता येईल, शारीरिक अपंग विद्यार्थ्यांना काय वेगळ्या सेवा देता येतील, विद्यापीठ संशोधनावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी काय करता येईल याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी विद्यापीठाचे कुलगुरू यांना अहवाल करण्यास सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘मिशन कर्मयोगी’; सुरु केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Next Post

राज्यात केवळ ५६ टक्केच कचऱ्यावर प्रक्रिया

Next Post
D

राज्यात केवळ ५६ टक्केच कचऱ्यावर प्रक्रिया

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011