नाशिक : दैवी अवकृपेने शरीराचा अवयव हिरावलेल्या दिव्यांगाची प्रशासनाच्या पातळीवर हेळसांड थांबलेली नाही. पण, दिव्यांगाच्या प्रोत्साहन देण्याच्या हेतूने प्रेरीत झालेले कर्तव्यदक्ष अधिकारी लाभले तर त्यांच्याही आयुष्यात सुखाचा क्षण येतो, याची प्रचिती नाशिक जिल्हा परिषदेत आली. २४ वर्षांपासून आरोग्य विभागातील दिव्यांगांच्या विस्तार अधिकारीपदी रखडलेल्या पदोन्नतीचा प्रश्न मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी मार्गी लावला. व अपंगत्वावर मात करून आरोग्य सेवा देणा-या अब्बू शेख व राजेश निकुंभ या दोन आरोग्य कर्मचा-यांना विस्तार अधिकारी विराजमान होण्याचा बहुमान दिला.
शासकीय सेवेतील दिव्यांग कर्मचा-यांना पदोन्नतीसाठी ३ टक्के आरक्षण आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील दिव्यांग कर्मचार्यांना सन १९९६ पासून हा लाभ मिळाला नव्हता. मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांची कर्मचा-यांना न्याय, हक्क मिळवून देण्याची कार्यपद्धत दिव्यांगांसाठी आशेचा किरण ठरला. अपंगांच्या पदोन्नतीच्या अनुशेषाबाबत त्यांच्याकडे कैफियत मांडली गेली. बनसोड यांनी प्रशासनाचे अधिकारी व कर्मचा-यांना तत्काळ प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले. २४ वर्षांपासून प्रलंबीत असलेला पदोन्नतीचा प्रश्न बनसोड यांच्या धडाकेबाज निर्णयाने अवघ्या दोन महिन्यात मार्गी लागला. सुरगाण्याचे आरोग्य सहाय्यक अबू शेख यांची नाशिक पंचायत समिती, तर कळवणचे आरोग्य सहाय्यक राजेश निकूंभ यांची देवळा पंचायत समितीला विस्तारअधिकारी पदी नियुक्तीचे आदेश शुक्रवारी (दि. ६) मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांच्या हस्ते देण्यात आले.
विस्तार अधिकारी पदाच्या पदोन्नतीसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, रवींद्र परदेशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, दिव्यांग संघटनेचे नेते दिगंबर घाडगे, मुख्य लेखा वित्तअधिकारी महेश बच्छाव यांच्यासह प्रकाश थेटे, अनिल गिते, संजय सोनवणे यांचे सहकार्य लाभले. यानिमित्ताने आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जी.पी.खैरनार, विजय देवरे, राजेंद्र बैरागी, मधुकर आढाव, श्रीकांत आहिरे, दीपक आहिरे, बाजीराव सूर्यवंशी, आरिफ सय्यद, सिताराम भोये, विजय सोपे, एकनाथ वाणी, सुनील देवकर, सुरेश जाधव, प्रशांत सोनवणे, बाळासाहेब चौधरी, जयराम सोनवणे, चेतन राऊत आदी उपस्थित होते.
…
कामाची पावती दिली
दिव्यांग कर्मचा-याचा पदोन्नतीचा प्रलंबीत प्रश्न मार्गी लावला याचा आनंद आहे. कोव्हीडच्या स्थितीत आरोग्य कर्मचारी योध्दयाची भूमिका निभावत आहे. त्यात दिव्यांग कर्मचारीही आहे. या निमित्ताने त्यांच्या कामाची पावती दिली आहे.
– लिना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सकारात्मक भूमिकेमुळेच शक्य
स्वप्नवत वाटणारी विस्तार अधिकारी पदाची पदोन्नती आज मिळाली. जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचार्यांनी सकारात्मक भुमिका दाखविल्याने हे शक्य झाले. आरोग्य विभागाच्या योजना सामान्य जनतेपर्यत पोहचवून नियुक्ती सार्थ ठरवू.
– अबू शेख, विस्तार अधिकारी, नाशिक पंचायत समिती