नवी दिल्ली – केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काही तासातच घुमजाव केले आहे. देशात सर्वांना कोरोना मोफत लस देण्याची घोषणा केल्यानंतर काही तासातच डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सर्वांना नाही तर १ कोटी आरोग्य सेवक आणि २ कोटी आघाडीचे कोरोना योद्धे यांनाच कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. त्यानंतर जुलैपर्यंत उर्वरीत २७ कोटी जनतेच्या (ज्येष्ठ नागरिक वैगेरे) लसीकरणाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. त्यामुळे लसीकरणाबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.
बघा, हर्षवर्धन यांचे ट्विट
https://twitter.com/drharshvardhan/status/1345265266767237120