नाशिक – मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक होत असताना आता धनगर समाजानेही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. धनगर आरक्षणाबाबत त्वरित अध्यादेश काढण्यात यावा या मागणीसह इतर मागण्यांसाठी धनगर समाजाने आज नाशिकसह राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. मराठा समाजासाठी असलेल्या सारथी संस्थेप्रमाणे महाज्योती संस्थेसाठीही निधी उपलब्ध व्हावा, मेंढपाळांवरील हल्ले त्वरित थांबवावे, या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.
आरक्षण त्वरीत मिळावे, धनगर समाजासाठी असलेल्या २२ योजनांसाठी तत्काळ १ हजार कोटी रुपये मिळावेत, धनगर विद्यार्थी व विद्यार्थीनींसाठी वसतीगृह सुरू करण्यात यावेत, मेंढपाळांना शस्त्र परवाने देण्यात यावेत आदी मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.