नाशिकरोड – शेतकरी विरोधी तीन कायदे रद करावे, शेतक-्यांना शेतीमालाला हमीभाव देणारा कायदा करण्यात यावा तसेच दिल्ली येथे सुरु आसलेला आंदोलनांस समर्थ व पांठिबा त्याचे मोनधैर्य वाढविण्यासाठी बहुजन शेतकरी संघटनाच्या वतीने गुरुवार ४ फेब्रुवारी रोजी नाशिक रोड येथील विभागीय महसुल आयुक्त कार्यालय समोर दिवसभर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक गावात शेतक-्यांना मध्ये जनजागृती करुन हे आंदोलन यशस्वी करावे असे प्रतिपादन दत्ता गायकवाड यांनी केले.
नाशिक रोड येथील एकलहरा रोडवरील कृषी बाजार समितीच्या उपबाजारात बहुजन शेतकरी संघटनाच्या वतीने शेतक-यांची झालेला बैठकीत गायकवाड बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थांनी अशोक खालकर हे होते. यावेळी व्यापारी बॅकेचे अध्यक्ष निवृत्ती आरिंगळे, ॲड. नितीन ठाकरे, किसान सभेचे राज्य सचिव राजु देसले, आर्किटेक उन्मेश गायधनी, नगरसेवक पंडित आवारे, मनोहर कोरडे, गोरख बलकवडे, रमेश औटे,वसंत अरिगंळे, शांताराम भागवत, नामदेव बोराडे, केशव बोराडे, योगेश भोर, अरुण भोर, रामचंद्र टिळे,उत्तम कोठूळे, संजय कोठूळे, मधुकर सातपुते, धनाजी अरिंगळे,पी.बी. गायधनी, विजय अरिगळे, जगन गवळी, रामचंद्र टिळे, चंद्रभान ताजनपुरे, बाळासाहेव अस्वले, राजाराम धनवटे, सुकदेव भागवत, हिरामण तेलोरे, स्वरुप वाघ, मधुकर औटे, नितीन जगताप, राजाराम लोखंडे, दिनकर आढाव, कुलदिप आढाव, संजय पोरजे, शरद कोठुळे, सखाराम साठे, संगिता नेहे, हरपाल वाजवा, सुदाम बोराडे, सुकदेव भागवत, तानाजी भोर, अनिल ताजनपुरे आदि उपस्थित होते.
२६ नोव्हेंबर २०२० पासून दिल्लीच्या सीमांवरती केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी विरोधी तीन कायदे व प्रस्तावित वीज बिल कायदा २०२० विरोधात, शेतकऱ्यांना शेतीमालाला हमीभाव देणारा कायदा करण्यात यावा आदि मागण्यासंदर्भात दिल्लीत लढणाऱ्या शेतकरी आंदोलनला पाठिंबा देण्यासाठी शेतक-यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी प्रत्येक गावात जनजागृती करण्यासाठी बैठका घेण्यात याव्या. सर्व शेतकरी बांधवांनी आपले पक्ष, गटतट बाजुला ठेवून एकत्र येवून या आंदोलनांस सहभागी व्हावे असेही दत्ता गायकवाड यांनी सांगितले. प्रास्ताविक व सुत्रसंचलान रमेश औटे यांनी केले.