नवी दिल्ली – तुम्हाला नवा आयफोन खरेदी करायचा असेल तर ही तुम्हाला चांगली संधी ठरू शकेल. कारण की ई कॉमर्स साईट अॅमेझॉन इंडियानं शनिवारी (१२ मार्च पासून) Apple Days Sale ची घोषणा केली आहे. हा सेल १७ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.
या सेलमध्ये Apple चे नवीन iphone पासून सर्व डिव्हाईसेसवर चांगली ऑफर देण्यात आली आहे. या सेलमध्ये iphone वर डिस्काउंटसह एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआयची सुविधा दिली जात आहे. शनिवारी पहिल्या दिवशी सेलमध्ये iphone 12 Mini बेस्ट डीलमध्ये उपलब्ध आहे. जाणून घेऊया iphone विषयी.
या आहेत ऑफर्स
या सेलमध्ये iphone वर मिळणार्या ऑफर्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये नो कॉस्ट ईएमआय पर्याय आणि एक्सचेंज ऑफरची सुविधा दिली जात आहे. त्याशिवाय जर तुमच्याकडे एचडीएफसी बँकेचे कार्ड असेल तर तुम्हाला ६००० रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.









