मनाली देवरे, नाशिक
….
सनरायझर्स हैद्राबाद संघाने विराट कोहलीच्या नेत़त्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा ५ गडी पराभव करून पहिल्या चारपैकी उरलेल्या तीन जागांसाठी असलेली स्पर्धा आता आणखी अवघड करून टाकली आहे. शनिवारचा दिवसा लो स्कोअरींग गेमचा दिवस ठरला. मुंबई इंडीयन्सने दिल्ली कॅपीटल्सला ११० धावात रोखले होते तर सनरायझर्स हैद्राबाद संघाने रॉयल चॅलेजर्स बंगलोर संघाला १२० धावात रोखले. नमुद करण्यासाठी गोष्ट म्हणजे हे दोन्ही सामने मुंबई आणि हैद्राबाद संघानी १५ व्या षटकातच जिंकल्यामुळे पराभूत झालेल्या संघाचे नेट रनरेट देखील बिघडवून ठेवले आहेत.
रॉयल चॅलेजंर्स बंगलोरने प्रथम फलंदाजी करतांना २० षटकात फक्त १२० धावा झळकावल्या. संदीप शर्मा आणि जेसन होल्डर यांच्या प्रभावी मा–यासमोर देवदत्त पडीकल, विराट कोहली आणि एबी डिव्हीलियर्स यांच्यासारखे फार्मातले फलंदाल सपशेल अपयशी ठरले. या सञातला दुसराच सामना खेळणा–या जॉश फिलीप्सने ३१ धावा केल्याने आरसीबीला किमान शंभरी तरी ओलांडता आली. हैद्राबादच्या टी.नटराजन ने तर कसोटी क्रिकेटला लाजवेल अशी गोलंदाजी केली. त्याच्या गोलंदाजीचे विश्लेषण होते ४ षटके, १ बळी आणि २.७५ च्या सरासरीने ११ धावा.
हे उद़दीष्ट गाठण्यासाठी सनरायझर्स हैद्राबादचा संघ मैदानात उतरला आणि वॄध्दीमान साहा सोबत मनिष पांडे यांनी दिलेल्या योगदानामुळे संघाची सुरूवात चांगली झाली. कमी धावांचे टारगेट गाठतांना अचानक विकेटस गमावल्या जाण्याची शक्यत असते. तशी एकवेळ सामन्यात आली देखील होती. पंरतु, अखेरीस जेसन होल्डरने डाव सावरला आणि १४.२ षटकात १२० धावा करून सनरायझर्स हैद्राबाद संघाने या सामन्यात विजय संपादन केला.
या निकालानंतर आयपीएलचा गुणफलक आता अधिकच क्लीष्ट बनला आहे. मुंबईने पहिल्या चार संघात जागा पक्की केल्यानंतर उर्वरीत ३ जागांसाठी आरसीबी, दिल्ली, किंग्ज इलेव्हन, सनरायझर्स, राजस्थान रॉयल्स आणि केकेआर असे ६ संघ शर्यतीत उभे ठाकले आहेत आणि आता कदाचित साखळीतला शेवटचा सामना खेळल्याखेरीज हे ३ संघ कोणॽ याचा उलगडा होणार नाही.
रविवारच्या दोन महत्वाच्या लढती
निर्णायक टप्यात येवून पोहाचलेल्या २०२० च्या आयपीएलमध्ये रविवारी चेन्नई सुपर किंग्ज विरूध्द किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स विरूध्द राजस्थान रॉयल्स यांच्यात सामने होणार आहेत. एकटया चेन्नई संघाचा अपवाद सोडला तर इतर तीनही संघाना प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. त्यामुळे, हा रविवार संघावर प्रेम करणा–या चाहत्यांसाठी सुपर संडे ठरणार आहे.