मनाली देवरे, नाशिक
रविवारी सायंकाळी होत असलेल्या आयपीएल स्पर्धेतला दुसरा साखळी सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब या दोन संघा दरम्यान दुबई इंटरनॅशनल मैदानावर होणार आहे. एकीकडे किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार के. एल. राहुल आणि दिल्ली संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर या दोन युवा नेतृत्वाची कसोटी या सामन्यात लागणार आहे. तर दुसरीकडे किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा प्रशिक्षक रिकी पॉंटिंग आणि दिल्ली संघाचा प्रशिक्षक अनिल कुंबळे या दोन मातब्बरांची देखील या सामन्यात परीक्षा आहे. या झटपट क्रिकेटमध्ये मात्र ख्रिस गेल फटकेबाजी करणार की शिखर धवन ? याकडेच क्रिकेट चाहत्यांचे लक्ष रहाणार असून त्यांच्या कामगिरीवर सामन्याचे भवितव्य ठरणार आहे.