मुंबई – इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) १४ व्या मोसमाची सुरुवात होण्यापूर्वीच किंग्स एलेव्हन पंजाबने एक मोठा निर्णय घेतला आहे. यावर्षी होणाऱ्या स्पर्धेत ही टीम एका नव्या नावासह मैदानात उतरणार आहे. किंग्स एलेव्हन पंजाबने आपले नाव बदलून पंजाब किंग्स टीम असे केले आहे.
किंग्स एलेव्हन पंजाब गेल्यावर्षी संयुक्त अरब अमिरातमध्ये झालेल्या सत्रातही खेळली होती. त्यावेशी १३ व्या स्थानावर हा संघ होता. सुरुवातीच्या सर्व सामन्यांमधील पराभवाचा फटका पंजाबला सहन करावा लागला. मुख्य म्हणजे या टीमने आतापर्यंत एकही सीझन जिंकलेला नाही.
आता १४ व्या सिझनमध्ये ही टीम एका नव्या नावासह उतरणार आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, हा संघ गेल्या अनेक वर्षांपासून नाव बदलण्याचा विचार करीत होता. पण यंदा ते शक्य होत आहे. त्यामुळे हा अचानक घेतलेला निर्णय नाही.
मोहित बर्मन, नेस वाडिया, प्रिती झिंटा आणि करण पॉल यांच्या मालकिची ही टीम आहे. एकदा या टीमने उपविजेतेपद पटकावले होते आणि एकदा तिसऱ्या स्थानापर्यंत मजल मारली होती. पुढच्या सिझनसाठई गुरुवारील खेळाडूंचा लिलाव सुरू होणार आहे. गेल्या सीझनमध्ये टीमने कर्णधार बदलून बघितला. त्यासाठी आर. अश्विनला दिल्ली कॅपिटल्समधून आणले गेले होते.