मुंबई – आज आयपीएलच्या साखळीत होणारा कोलकात्ता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हा सामना पुढे ढकलण्यात आला असून याबाबतची सविस्तर माहिती लवकरच बीसीसीआय तर्फे जाहीर करण्यात येईल. कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वारियर्स हे दोन खेळाडू कोविड चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे.