मुंबई – आर्थिक वर्ष २०२०-२१ संपण्यासाठी आता केवळ दोनच महिने शिल्लक आहे. त्यामुळे या कालावधीत लोक इंकम टॅक्स वाचविण्यासाठी जास्तीत जास्त गुंतवणुक करतात. त्यामुळेच बहुतेक सर्वच कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रे जमा करायला सांगत असतात.
जर तुम्ही जुन्या टॅक्स सिस्टीममध्ये आहात आणि आतापर्यंत टॅक्स सेव्हींसाठी पुरेशी गुंतवणुक केलेली नसेल तर तुमच्याजवळ आता फार कमी वेळ उरला आहे. तुम्ही विविध फंड्समध्ये गुंतवणुक करून इन्कम टॅक्स वाचवू शकता.
पीपीएफ – टॅक्स आणि गुंवणुक तज्ज्ञ सांगतात की जर तुम्ही आतापर्यंत पुरेशी गुंतवणुक केलेली नसेल तर तुम्ही पहिली प्राथमिकता पब्लिक प्रोव्हीडंट फंडमध्ये (पीपीएफ) गुंतवणुकीला द्यायला हवी. या फंडात तुम्ही वर्षाला दिड लाख रुपयांपर्यंत गुंतवणुक करू शकता आणि सेक्शन ८० सी अंतर्गत देण्यात आलेल्या सवलतीचा पूर्ण लाभ घेऊ शकता. दुसरे म्हणजे यावर इतर सेव्हींक स्कीम्सच्या तुलनेत उत्तम व्याज मिळते. याशिवाय गुंतवणुक, व्याज आणि मॅच्योरिटी कालावधीवर प्राप्त रकमेवर कुठलाही टॅक्स देय नसतो.
एनएससी – तज्ज्ञ सांगतात की नॅशनल सेव्हींग सर्टिफिकेट देखील गुंतवणुकीच्या दृष्टीने उत्तम पर्याय आहे. यात पाच वर्षांचा लॉक–इन पिरीएड असतो. याचे वैशिष्ट्य असे आहे की गुंतवणुकीच्या वेळी असलेला व्याजदर संपूर्ण पाच वर्षांसाठी पहिल्याच दिवशी लागू झालेला असतो. यासोबतच यावर मिळणाऱ्या व्याजावर ८० सी अंतर्गत सवलतही प्राप्त करता येते.
एनपीएस – या फंडात ५० हजार रुपयांची गुंतवणुक केली जाऊ शकते. कारण यात टॅक्सवर वेगळी सूट मिळते. आणि याचा दुसरा कुठला पर्यायी भागही उपलब्ध नाही.
आरोग्य विमा – आरोग्य विम्यावर तुम्हाला टॅक्समध्ये सवलत मिळते. सेक्शन ८० डी मध्ये ५० हजार रुपयांपर्यंत करात सवलत मिळत असते. यात २५ हजार रुपयांपर्यंतची सूट पती, पत्नी, मुलांसाठी काढण्यात आलेल्या विम्यावर मिळते.