पिंपळगाव बसवंत – आम आदमी पार्टीच्या नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी उत्तमराव निरभवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा ग्रामीणची घोषणा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रंगा राचुरे, धनंजय शिंदे यांनी केली.
निरभवणे यांची निवड झाल्याची घोषणा होताच निफाड तालुक्यात आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांच्या निवडीनंतर सुरेश देवकर, अनिल शिंदे, मोहन आरोटे, वसंत वासले, भारत पवार, वाळू सांगळे, राजेंद्र दिवेकर, बापू साळुंखे, विष्णू साबळे, किशोर निरभवणे, जितू गवारे, सागर खडताळे, मनोज खडताळे, उत्तर महाराष्ट्र सचिव प्रभाकर वायचले, अनिल कौशिक, अल्ताफ शेख यांनी अभिनंदन केले.