नवी दिल्ली – बॉलिवूड अभिनेता आमीर खानची मुलगी इरा खान पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. आमीरचाच फिटनेस कोच नुपूर शिखर याच्यासोबत ती सध्या डेट करत आहे. गेल्या वर्षी इराचा एक्स बॉयफ्रेंड मिशाल क्रिपलानी याच्यासोबतचे इराचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. आता तिचे फोटो नुपूरसोबत दिसत आहेत.
पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार इरा खान आणि नुपूर शिखर लॉकडाऊन पासून परस्परांना डेट करत आहेत. इरा खानने देखील फिटनेसकडे लक्ष द्यायचं ठरवलं आणि या दोघांमधील जवळीक वाढू लागली. नुकतेच हे दोघे पिकनिक म्हणून महाबळेश्वरला गेले होते. एकमेकांच्या आईशी देखील त्यांचे बोलणे झाले आहे. आमीरची पहिली पत्नी आणि इराची आई रिना दत्त हिने याबद्दल काहीही सांगितलेले नाही. पण नुपूर शिखरच्या आईच्या फोटोंवर इरा खान खूप कमेंट्स देताना दिसते.
इरा खानने अद्याप अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेले नाही. पण दिग्दर्शन आणि थिएटरमध्ये ती सक्रीय असते. तर नुपूर शिखर फिटनेस कोच असून सध्या आमीर खान, इरा खान आणि सुश्मिता सेन याना तो प्रशिक्षण देतो आहे.