नाशिक – अभिनेता आमिर खान आणि माधुरी दीक्षित हे रविवारी नाशकात असल्याचे दिसून आले. आमीर यांचे गंगापूर धरणाजवळील फ्रावशी अकॅडमीच्या हेलिपॅडवर रविवारी सकाळी आगमन झाले. यावेळी फ्रावशी अकॅडमीचे संचालक रतन लथ यांनी त्यांचे स्वागत केले. एका चित्रपटासाठी शुटींगची ठिकाणे निश्चित करण्यासाठी ते नाशकात आले. त्यांनी देवळाली कॅम्पसह काही भागाचा दौरा करुन पाहणी केली. दरम्यान, एका चित्रपटाच्या शुटींगसाठी अभिनेत्री माधुरी दीक्षितही नाशकात असल्याचे सांगितले जात आहे.