नाशिक – ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होण्यासाठी आमदार सरोज आहिरे यांनी २५ लाखांचा निधी देणार असल्याचे घोषीत केले होते, तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींना निधीचे पत्र आ. आहिरेंच्या हस्ते देण्यात आले. यामुळे गावांच्या विकासाला अतिरिक्त निधी मिळाल्याने ग्रामस्थ आनंद व्यक्त करत आहे.
कोरोना काळात प्रशासनावरील कामाचा ताण वाढू नये व स्थानिक वादविवाद टाळण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायती विरोध करण्याचे आवाहन आमदार सरोज आहिरे यांनी केले होते, मतदार संघातील शिरडशेत, रायगड नगर व आंबे बहुला या तीन गावांच्या ग्रामस्थांनी एकत्रीत यैऊन बिनविरोध निवडणुका केलेल्या गावांना आमदारांच्या स्थानिक निधीतून वर्ग करण्यात येत असल्याचे सांगितले, रविवारी (दि.१४) आमदार आहिरेंच्या हस्ते तिरडशेतचे सरपंच अमित बोडके, उपसरपंच शैला वाघ, रायगड नगरच्या सरपंच काळुबाई शिंदे, उपसरपंच संजय लचके व आंबे बहुला गावाच्या सरपंच सुमन देशमुख, उपसरपंच पांडुरंग गवारी यांना पंचवीस लाख रुपयांचे पत्र दिले. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, डाॅ. प्रवीण वाघ, पंचायत समितीचे माजी सभापती रत्नाकर चुंबळे, विक्रम कोठुळे, सोमनाथ बोराडे, सुदाम भावले, आदी उपस्थित होते.