नाशिक – देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार सरोज अहिरे यांचा विवाह येत्या २१ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे. नाशिकरोड येथील दंतरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण वाघ यांच्याशी त्यांचा विवाह होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून डॉ. वाघ हे नाशिकरोड येथे सेवा देत आहेत. अहिरे या विद्यमान आमदार आहेत. त्यांनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मोठा विजय मिळविला आहे. अहिरे आणि डॉ. वाघ हे सध्या मुंबई व पुण्यातील विविध मान्यवरांना विवाहाचे निमंत्रण देत आहेत.
https://twitter.com/supriya_sule/status/1361342824235470857