परभणी – जिल्हाधिकारी आणि आमदार यांना बैलगाडीतून प्रवास कराताना कधी पाहिलंय का. जिल्ह्यात मात्र ही घटना घडली आहे. अतिवृष्टीमुळे शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर आणि गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांना चक्क बैलगाडीतून प्रवास करावा लागला आहे. जेथे शेतपिकांचे अधिक नुकसान झाले. तेथे जाण्यासाठी रस्ता नसल्याने दोघांनाही बैलगाडीतून जाण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता. जिल्हाधिकारी आणि आमदारांना चिखलातून पायी जावे लागू नये म्हणून शेतकऱ्यांनी बैलगाडी आणली. या बैलगाडीद्वारे त्यांनी प्रवास केला. नुकसानीची पाहणी केली. या प्रवासात मात्र दोघांनाही ग्रामीण रस्ते आणि त्यांची स्थिती यांची चांगलीच प्रचिती आली.