मुंबई – जोशीमठ-मलारी महामार्गावर ऋषिगंगा येथे हिमखंड कोसळल्याने रैणी गावात पूल वाहून गेला. त्यानंतर भारत-चीन सीमेवरील १३ गावांमध्ये वाताहत झाली. देशापासून तुटलेल्या या गावांमध्ये भारतीय सैन्यातील जवाह सहा किलोमीचर पायी चालत जाऊन पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू पोहोचवत आहेत.
चमोली जिल्ह्यात नीती-मलारी महामार्गावर रैणी पूल वाहून गेल्यानंतर रैणी, लाता, जुगजू, जुआग्वाड, पैंग, मुरंडा, सूगी भलगावसह १३ गाव पूर्णपणे विखुरले गेले आहेत. या गावांमध्ये सैन्याच्या वतीने मदतकार्य सुरू झाले आहे. तसेच त्यांना औषधे, भोजन तसेच इतर जीवनावश्यक वस्तू पोहोचविल्या जात आहेत.
मात्र अनेक पूरग्रस्त गावे अशी आहेत जी रस्त्यांपासून खूप लांब आहेत. जुगजू, जुआग्वाड, पैंग, मुरंडा ही गावे रस्त्यांपासून तब्बल सहा किलोमीटर लांब आहेत. अश्या ठिकाणी मदतकार्य करण्यासाठी भारतीय जवान जंगल आणि डोंगर कापत पायी चालत जात आहेत. पूरग्रस्त गाव सूगीचे सरपंच लक्ष्मण सिंह बुटोला सांगतात की अश्या परिस्थित भारतीय सैन्य आणि आयटीबीपीचे जवान ज्या पद्धतीने मदतकार्य करीत आहेत ते कौतुकास्पद आहे. जवानांच्या या हिंमतीला आणि जिद्दीला आमचा सलाम आहे.
१२६ गावकऱ्यांना बाहेर काढले
प्रशासनाच्या वतीने रैणी गावातील पूल तुटल्यानंतर वेगवेगळ्या भागात फसलेल्या निती घाटातील १२६ गावकऱ्यांना हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढले. जोशीमठच्या उपजिल्हाधिकारी कुमकुम जोशी यांनी सांगितले की अनेक गावकरी असे होते जे कामाच्या निमित्ताने आले होते आणि पूल तुटल्यावर तिथेच अडकून पडले.