मुंबई – उद्योगपती आनंद महिंद्रा हे ट्विटरवर अतिशय सक्रीय असतात. त्यामुळे ते सतत विविध प्रकारच्या पोस्ट, व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतात. आताही त्यांनी दिल्लीतील दोन सफाई कामगारांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यानिमित्ताने दोन नवख्या आणि अफलातून गायकांची ओळख संपूर्ण देशाला झाली आहे. या दोन्ही सफाई कामगारांच्या आवाजात जादू असून त्यांच्यातील या टॅलेंटला आपण ओळखायला हवे, असे महिंद्रा यांनी म्हटले आहे.
बघा हे दोन्ही व्हिडिओ
https://twitter.com/anandmahindra/status/1363069966795247616









