नवी दिल्ली – प्रसिद्ध उद्योजक व महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा ट्विटरवर खूप अॅक्टिव्ह असून लोकांना त्यांची प्रतिसाद देण्याची पद्धतही आवडते. यावेळी आनंद महिंद्राने ट्विटरवर लिहिले की, त्यांनी संदेश पाठविण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी सिग्नल अॅप ओपन केला आहे. यानंतर, लोकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कारण आता व्हॉट्सअपपेक्षा सर्वात मोठा पर्याय म्हणून सिग्नल अॅपकडे पाहिले जात आहे.
व्हॉट्सअॅपच्या नव्या धोरणाची घोषणा झाल्यानंतर सिग्नल अॅपला लोकांकडून ग्रीन सिग्नल देण्यात आला असून त्याला चांगली पसंती देखील मिळत आहे. सिग्नल अॅप डाउनलोड्स करणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहेत. केवळ भारतातच, गेल्या एका आठवड्यात सिग्नल डाउनलोड करण्यात ३६ टक्के वाढ झाली आहे. आता टेलिग्राम नंतर व्हाट्सअपपेक्षा सर्वात मोठा पर्याय म्हणून सिग्नल अॅपकडे पाहिले जात आहे.
सिग्नल अॅप बद्दल सर्वात जास्त चर्चा होत आहे, कारण ते गोपनीयता पाळत असून सुरक्षित आहे, असे म्हटले जाते. म्हणूनच सिग्नल अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याचे गोपनीयता धोरण काळजीपूर्वक समजून घेणे अधिक चांगले आहे. सेन्सर टॉवरच्या डेटाचे हवाला देत असे म्हटले आहे की, सिग्नल अॅप अँड्रॉइड आणि आयओएस उपकरणांवर मागील दोन दिवसांत १ लाखांहून अधिक लोकांनी डाउनलोड केले आहे. तसेच, २०२१ च्या पहिल्या आठवड्यात व्हॉट्सअॅपच्या नवीन इंस्टॉलेशन्समध्ये मात्र ११ टक्क्यांनी घट झाली आहे.
https://twitter.com/anandmahindra/status/1348133667592290307