नाशिक : मद्यधुंद अवस्थेत झालेल्या हाणामारीत बेशुध्द पडलेला मित्र आपल्या जीवावर उठेल या भीतीतून एकाने आपल्या मित्राच्या डोक्यात वजनी दगड घालून हत्या केल्याचा प्रकार पोलीस तपासात समोर आला आहे. या घटनेत अटक केलेल्या संशयीताने गुह्याची कबुली दिल्याने आनंदवली येथे झालेल्या खूनाचा उलगडा झाला आहे. संशयीतास न्यायालयाने रविवार (दि.१०) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
रुपेश छोटुलाल यादव (३६, रा.शिवशक्ती चौक,सिडको) असे पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. आनंदवली येथील निर्जनस्थळी असलेल्या महापालिकेच्या वास्तूत मंगळवारी (दि.५) रात्री ही घटना घडली होती. या घटनेत महेश विष्णू लायरे (२९,रा. दत्तनगर, चुंचाळे) या युवकाचा खून करण्यात आला होता. मद्यधुंद संशयीतास घटनास्थळीच पोलीसांनी बेड्या ठोकल्या होत्या तर मृताची ओळख रात्री उशीरा पर्यंत पटली नव्हती. पोलीस तपासात मृत आणि संशयीत एकमेकांचे मित्र असून, ते रात्री मनपाच्या वापरात नसलेल्या इमारतीत नेहमीप्रमाणे मद्यपान करीत असतांना ही घटना घडली. चेष्टामस्करीत दोघांमध्ये हाणामारी झाल्याने महेश लायरे बेशुध्द पडला. महेश उठल्यानंतर आपणास जिवंत सोडणार नाही या भीतीतून रूपेश यादवने जवळच पडलेला वजनी दगड उचलून बेशुद्ध अवस्थेत असलेल्या महेशच्या डोक्यात हाणला. त्यात त्याचा मृत्यु झाला. मद्याच्या नशेत तर्रर्र असलेल्या यादवने काही अंतरावर जावून वाच्यता केल्याने नागरीकांनी त्यास पोलीसांच्या स्वाधिन केले. गंगापूर पोलीसांनी घटनास्थळ गाठून मृताची ओळख पटवली असून हा खून मित्रानेच जीवे ठार मारण्याच्या भितीतून केल्याचे पुढे आले आहे. न्यायालयाने संशयीतास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.