नाशिक – देवळाली कॅम्प येथील क्रीडापटूंसाठी असलेल्या आनंद रोडवरील एकमेव मैदानाची दुरवस्था झाली आहे. त्याची तातडीने दुरुस्ती करुन ते खुले करण्याची मागणी मास्टर स्पोर्ट्स क्लबने केली आहे. यासंबंधीचे निवेदन कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष सचिन ठाकरे यांना देण्यात आले आहे.
देवळाली कॅम्प परिसरातील युवकांसाठी आनंदरोड मैदान व जॉगिंग ट्रेक लाभधायक ठरत असतांना गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे मैदान प्रशासनाकडून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या मैदानावर मोठ्या प्रमाणावर गवत उगवले आहे. तसेच सरपटणारे प्राणी ही येथे आढळून येत आहे. याबाबत मास्टर स्पोर्टस क्लबचे अध्यक्ष सुनील दिनकर, विलास जाधव व सुधाकर गोडसे यांनी बोर्ड उपाध्यक्ष सचिन ठाकरे यांची भेट घेऊन मैदानाची तातडीने दुरुस्ती करून ते खुले करण्याची मागणी केली. या बाबत बोर्डाच्या माध्यमातून आपण सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने मैदान दुरस्तीची कार्यवाही करू, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले.
सदर मैदानावर खासदार हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून ५० लाखांची प्रेक्षक गेलरी तर कॅन्टोन्मेंटच्या माध्यमातून ७५ लाखाचा जॉगिंग ट्रेक उभारला आहे. याशिवाय गत वर्षी मास्टर स्पोर्टस क्लबचे सदस्य गुंडापा देवकर यांनी संपुर्ण मैदानाचे सपाटीकरण करून दिले होते. कॅन्टोन्मेंट बोर्ड मैदानाबाबत काय निर्णय घेते याकडे क्रीडा प्रेमींचे लक्ष लागून आहे.
I totally agree. This place Devlali Camp has lot of potential to look so beautiful , the stadium at Anand Road should as always be maintained, the roads to be broadened, footpath to be arranged, keep stray animals away….remove pot holes…keep signals at crossroads and keep dedicated pedestrian crossing…improve the infrastructure of Devlali and the Stadium.