नवी दिल्ली – सध्याच्या युगात आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र असून प्रत्येक शासकीय कामात आधार कार्ड आवश्यक असते. हे एक युनिक आयडेंटिफिकेशन असून अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) ते जारी केले आहे. त्यामुळे वापरकर्त्यांची बायोमेट्रिक आणि लोकसंख्याशास्त्रविषयक माहिती नोंदवली जाते. परंतु, कधीकधी आपल्या आधार कार्डाच्या तपशीलांचा गैरवापर केला जात असेल, अशी शंका आली तर घरबसल्या आपण शोधू शकता.
यूआयडीएआय वेबसाइटवर आधारित आधार इतिहास सेवेद्वारे कार्डधारकांनी आतापर्यंत त्यांची आधार कार्ड कुठे वापरली आहेत हे शोधून काढू शकता. मात्र या सेवेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत मोबाइल नंबर अनिवार्य आहे.
आधार कार्डधारक मागील महिन्यांत कोणत्याही एजन्सीच्या वतीने किंवा अन्य कोणाच्या वतीने केलेल्या सर्व प्रमाणीकरण रेकॉर्डचा तपशील पाहू शकतात.
कोणताही आधार कार्ड धारक त्यांचा आधार क्रमांक किंवा व्हीआयडी वापरून आणि वेबसाइटवर दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करून यूआयडीएआय वेबसाइटवरून त्यांचा आधार प्रमाणीकरण इतिहास तपासू शकतो.
तथापि, एकाच वेळी फक्त ५० रेकॉर्ड पाहिली जाऊ शकतात. हे रेकॉर्ड कसे बघायचे आणि डेटा कसा मिळवावा ते जाणून घेऊ…
१. यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर भेट द्या.
२. ‘माझा आधार’ पर्यायावर क्लिक करा.
३. एक नवीन विभाग उघडेल, त्यावर ‘आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री’ वर क्लिक करा.
४. तुमचा आधार क्रमांक आणि आय डी नंबर भरा.
५. आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठविला जाईल.
६. तुमचा ओटीपी प्रविष्ट करा.
७. नवीन विंडो दोन पर्यायांसह उघडतील, तेथे विंडो ऑथेंटिकेशन टाइप आणि डेटा बघा.
८. आधारच्या वापराशी संबंधित सर्व माहिती सापडेल.
९.आधार कार्ड धारकाद्वारे केलेल्या प्रत्येक प्रमाणीकरणासाठी आपण आधार प्रमाणीकरण इतिहासामध्ये विविध माहिती मिळवू शकता.