नवी दिल्ली- आजच्या काळात कोणत्याही कामासाठी आधार कार्ड आवश्यकच आहे. आपण नवीन सिमकार्ड खरेदी करणार असाल किंवा नवीन बँक खाते उघडत असल्यास आपल्या ओळखीकरिता आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक ठरते. त्याच वेळी, मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडला गेल्यास काम करणे आणखी सोपे होते.
आधार कार्ड देणार्या संघटनेने म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियाने म्हटले आहे की, आधार कार्ड हे मोबाईल नंबरशी अद्ययावत करुन ई-आधार डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यासाठी https://uidai.gov.in/ या वेबसाईटवर क्लिक करावे.
-
या करिता नाव, जन्मतारीख, पत्ता, लिंग ऑनलाईन यासारख्या तपशीलांची माहिती अद्ययावत करावी.
-
आपण मोबाईल नंबर पडताळणीद्वारे आधारशी संबंधित अनेक ऑनलाइन सेवा मिळवू शकतो.
-
आधारसह मोबाईल क्रमांक नोंदविण्यासाठी किंवा पूर्व-नोंदणीकृत क्रमांक अद्ययावत करण्यासाठी जवळच्या कोणत्याही आधार नोंदणी केंद्र किंवा आधार सेवा केंद्राला भेट देऊ शकतो.
-
आपण यूआयडीएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अॅपद्वारे जवळचे आधार केंद्र शोधू शकतो.
-
आपण १९४७ वर कॉल करून जवळच्या आधार सेवा केंद्राबद्दल माहिती देखील मिळवू शकतो.
-
मोबाइल नंबर अद्ययावत करण्यासाठी कोणत्याही दस्तऐवजाची आवश्यकता नाही.
-
बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनद्वारे आधार नंबरमध्ये मोबाइल नंबर अद्यावत केला जातो. यासाठी आपल्याला ५० रुपये शुल्क भरावे लागेल .