नाशिक – विद्यार्थी, नोकरदार वर्ग, विक्रेते, उद्योग – व्यावसायिक, महिला, शेतकरी असो की, ज्येष्ठ नागरिक सर्वांनाच शासकीय तसेच खासगी कामांसाठी आधार कार्डाची आवश्यकता असते. सध्या तर कोरोना बाधित रुग्णांना देखील उपचारार्थ लागणाऱ्या कागदपत्रात आधार कार्डाची गरज भासते. त्यामुळे सर्वजण या कार्डाला जपतात, सदर कार्ड हरवले तर धावपळ उडते. आणि त्यांच्या कडे हे कार्ड नाही, त्यांचा गोंधळ उडून कामात अडचण निर्माण होते. तसेच पैसा आणि वेळ वाया जातो, मात्र आता आधार कार्ड हरवल्यास काळजी करू नका, घरी बसून डिजिटल कॉपी काढता येणे शक्य होणार आहे.
कोणत्याही व्यक्तीला विविध योजनांचा आणि अनेक प्रकारच्या सेवांचा लाभ मिळण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. म्हणून प्रत्येकासाठी हे महत्वाचे आहे, अशा परिस्थितीत जर आपले आधार कार्ड हरवले तर आपल्याला खूप मनस्ताप होतो, तसेच नवीन कार्ड काढताना त्रास होतो. मात्र आता आपण काही वेळात योग्य प्रक्रिया पूर्ण करून काही मिनिटांत आपल्याला आधार कार्डची डिजिटल प्रत घरच्या घरीच मिळवू शकते. युनिक आयडेंटिफिकेशन थॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) संस्थेच्या वतीने आधार कार्ड धारकांना आणि त्यासाठी नोंदणी करणांऱ्याना डिजिटल प्रती डाउनलोड करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे आपण घरीच डाउनलोड केलेला आधार कार्ड नंबर हा पोस्टद्वारे प्राप्त केलेला आधार कार्ड नंबर इतकाच वैध असणार आहे.
डिजिटल कॉपी अशी डाउनलोड करा
सर्वप्रथम यूआयडीएआयच्या आधार पोर्टलवर https://uidai.gov.in/ यावर लॉग इन करा. आता ‘आधार मिळवा’ विभागाअंतर्गत ‘आधार डाउनलोड करा’ या लिंकवर क्लिक करा. ‘आधार डाउनलोड करा’ वर क्लिक केल्यानंतर नवीन पृष्ठ उघडेल. या पृष्ठावरील, आपण एकतर आधार क्रमांक (यूआयडी), नोंदणी क्रमांक (ईआयडी) किंवा आभासी क्रमांक (व्हीआयडी) प्रविष्ट करू शकता. आता आपल्याला कॅप्चा कोड प्रविष्ट करावा लागेल आणि ‘ओटीपी पाठवा’ या पर्यायावर क्लिक करा. आता आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ६-अंकी ओटीपी उपलब्ध असेल. नवीन पृष्ठावर, आपण ओटीपी प्रविष्ट करता आणि द्रुत सर्वेक्षणातील काही प्रश्नांची उत्तरे देखील द्या. आता व्हेरिफाई अँड डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करा. यानंतर आपल्या आधार कार्डची डिजिटल कॉपी डाउनलोड केली जाईल. आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक कॉपी संकेतशब्द संरक्षित आहे. आधार कार्डची डिजिटल कॉपी उघडण्यासाठी तुम्हाला पासवर्ड भरावा लागेल. संकेतशब्दाविषयी आपल्याला ‘सत्यापित करा आणि डाउनलोड करा’ खाली माहिती मिळेल. हा संकेतशब्द आपल्या नावाची पहिली चार अक्षरे आणि नंतर आपल्या जन्माचे वर्ष आहे. अर्थात ही सर्व प्रक्रिया करताना योग्य काळजी ( खबरदारी ) घ्यावी, असेही या संस्थेने म्हटले आहे.