नाशिक – आदिवासी गौरव दिनानिमीत्त सोशल नेटवर्कींग फोरमच्या पेठ अभ्यासिकेस आयएमएच्या नाशिक शाखेने सामाजिक दायीत्व निभावत ५१ हजारांची पुस्तके भेट दिली. या माध्यमातून शहरांपासून कोसो दूर वाडी वस्तीवर प्रतिकूल भौतिक सुविधांशी सामना करत अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या या गरूड भरारीला नाशिकच्या इंडियन मेडीकल असोसीयशन (आयएमए) ने पंखात बळ दिले आहे. युपीएससी, एमपीएससीपासून पोलीस,
ग्रामसेवक आणि तलाठी अशा सर्व परिक्षांची पुस्तके या सेटमध्ये ऊपलब्ध करून देण्यात आली आहेत. उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असतांनाही केवळ कुटूंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने शहरात जाऊन अभ्यास करणे शक्य नसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना फोरमने पेठ नगरपंचायतच्या सहकार्याने सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
९ ऑगष्ट क्रांतीदिन व आदिवासी गौरव दिनाचे औचित्य साधून आयएमएचे अध्यक्ष डॉ. समीर चंद्रात्रे, सचिव सुदर्शन आहिरे, माजी अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे, कोषाध्यक्ष डॉ. प्रशांत सोनवणे, उपाध्यक्ष डॉ. प्राजक्ता लेले, सोशल विंग डॉ.पंकज भदाणे यांच्या सहकार्याने हा अतिशय समाजोपयोगी उपक्रम संपन्न झाला.
पुस्तक भेट समारंभ प्रसंगी आयएमएचे सचिव डॉ. सुदर्शन आहिरे, माजी अध्यक्ष डाॅ. प्रशांत देवरे, जि.प. सदस्य भास्कर गावीत, नगराध्यक्ष मनोज घोंगे, उपनगराध्यक्ष कुमार मोंढे, उपसभापती पुष्पा पवार, संचालक शामराव गावीत, तुळशिराम वाघमारे, पुष्पा गवळी, गणेश गवळी, गिरीश गावीत, विशाल जाधव, मोहन कामडी, याकूब शेख, भागवत पाटील, महेश टोपले, नगरपंचायतीचे प्रशासन अधिकारी चंद्रकांत भोये, हरी पागी, किरण भूसारे यांचे सह नगरसेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.