नाशिक – सार्वजनिक स्वास्थ्याचा विचार करुन मिठाई व दुग्धजन्य पदार्थ हे नाशवंत असल्याने त्यापासून मानवी शरीरावर दुष्परिणाम व अन्न विषबाधेची शक्यता गृहीत धरुन अन्न सुरक्षा व मान प्राधिकरण यांनी ग्राहकास खुल्या स्वरुपाची मिठाई सुरक्षित मिळण्याच्या दृष्टीकोनातून १ आँक्टोंबर पासून खुल्या मिठाईला BEST BEFORE DATE प्रदर्शित करणे बंधनकारक केले आहे.
मंगळवारी अन्न व अौषध प्रशासनाचे सह आयुक्त चं.दौ. साळुंके यांच्या दालनात शहरातील प्रमुख मिठाई उत्पादक, विक्रेते व पदाधिकारी यांची बैठक झाली. सदर बैठकीत सहायक आयुक्त गणेश परळीकर हे उपस्थितीत होते. प्रशासनातर्फे सदर नव्या आदेशाची सर्व उपस्थितांबरोबर चर्चा झाली. सर्व उपस्थितांनी मिठाईवर अशा प्रकारे BEST BEFORE DATE टाकण्याबाबत आश्वासित केल्याचे अन्न व अौषध प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
तरी सर्व मिठाई, उत्पादक, विक्रेते, हलवाई, हॅाटेल व्यावसायिक यांनी त्यांच्या आस्थापने विक्री होणा-या खुल्या मिठाईवर BEST BEFORE DATE प्रदर्शित करावे असे आवाहन अन्न व अौषध प्रशासनातर्फे करण्यात आले. सदर तरतुदीचे उल्लंघन हे द्रव्यदंडास शिक्षेस पात्र असेल असे सह आयुक्त चं.दौ. साळुंके यांनी सांगितले.